Piyush Goyal : 'देशाची अर्थव्यवस्था २०४७ पर्यंत १० पट होईल' : केंद्रीय मंत्री पीयूष गोयल

Ahimsa Run Program : सध्या राज्यासह देशात लोकसभा निवडणुकांच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. तर भाजपसह काँग्रेस आणि इतर प्रमुख पक्ष विकासाच्या मुद्द्यावर बोलत आहेत.
Piyush Goyal
Piyush GoyalAgrowon

Pune News : राज्यासह देशात सध्या लोकसभा निवडणूकीचे वारे वाहू लागले आहेत. तर सत्ताधारी भाजपसह विरोधातील इतर प्रमुख पक्ष सर्वसामान्यांसमोर विकासाचा मुद्दा घेऊन जात आहेत. यादरम्यान केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी, 'देशाच्या अर्थव्यवस्थेवर बोलताना, 'देशाची अर्थ व्यवस्था २०४७ पर्यंत १० पट होईल. फक्त सर्वांची साथ हवी आहे', असे म्हटले आहे. ते रविवार (ता.३१) मुंबईत आयोजित 'अहिंसा रन' कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर बोलत होते.

आजचा तरूण रोजगार देणारा

यावेळी गोयल म्हणाले की, 'आजचे तरुण सरकारी नोकऱ्यांच्या मागे धावत नाहीत. तर स्वत:च्या कौशल्याच्या जोरावर रोजगार देणारे बनत आहेत. आजचा तरुण नवनवीन प्रयोग आणि तंत्रज्ञानाने देशाला पुढे नेत आहे. यामुळे २०४७ पर्यंत भारत एक विकसित देश बनेल आणि देशाची अर्थव्यवस्था १० पटीने मोठी होईल', असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला.

Piyush Goyal
Minister Piyush Goyal : गहू, तांदूळ, साखर निर्यातबंदीवरून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांचे मोठे विधान; म्हणाले, 'सरकारचा कोणताही....'

यावेळी गोयल यांनी, 'मोदी सरकारने केलेल्या विविध कामांची माहिती देताना, गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे काम केले. मोदी यांनी यासाठी ठोस पावले उचलली. तर मोदी यांनी सर्वच क्षेत्रात सुशासन आणण्याचा प्रयत्न केला. गरिबांच्या कल्याणासाठी अनेक योजना सुरू केल्या'. तसेच, 'मोदींनी कमकुवत अर्थव्यवस्थांमधून भारताला पहिल्या पाच अर्थव्यवस्थांमध्ये आणण्याचे काम मोदींनी केले', असे गोयल म्हणाले.

याचबरोबर गोयल यांनी, 'भारतात क्रीडा सुविधा वाढत असून विविध क्रीडा स्पर्धांमध्ये आपले खेळाडू पदके मिळवत आहेत. यामुळे येथे जागतिक दर्जाचे क्रीडा संकुल बांधायचे आहे. पण हे स्वप्न जेव्हा सर्वजण आमच्या पाठीशी उभे राहतील. तेव्हाच शक्य होईल, असेही गोयल म्हणालेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com