Onion Export Ban : अखेर केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी हटवली; ३ लाख मेट्रिक टनाची मर्यादा

Modi Govt Lifts Onion Export Ban : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्र्यांच्या समितीच्या बैठकीत कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासोबतच ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने मान्यता दिली आहे.
Onion Export Ban
Onion Export BanAgrowon

Pune News : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने कांद्याच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज रविवार (१८ रोजी) केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखालील मंत्र्यांच्या समितीने निर्णय घेतला. तसेच या समितीने कांदा निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास समितीने मान्यता दिली आहे. याआधी डिसेंबर २०२३ मध्ये कांद्याचे वाढते भाव लक्षात घेऊन केंद्राने ३१ मार्च २०२४ पर्यंत बंदी घातली होती.

बंदी उठवण्याचा निर्णय

आज पार पडलेल्या गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ३ लाख मेट्रिक टन कांदा निर्यात करण्यास मंजूरी देखील देण्यात आली आहे. मात्र ही बंदी उठवण्यामागची कारणे गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याचा साठा असल्याचे बोलले जात आहे. तसेच सध्या दिल्ली येथे सुरू असणारे शेतकऱ्यांचे आंदोलन आणि महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून व्यक्त केलेला असंतोष ही याला कारणीभूत आहे.

दरम्यान गुजरात आणि महाराष्ट्रातील कांद्याच्या साठा आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत माहिती केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना दिली होती. यानंतरच ही बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Onion Export Ban
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदी मागे घ्या

३ लाख मेट्रिक टन कांदा

सतत कांद्याच्या दरात घसरण सुरूच होती. जो मध्यंतरी १०० रूपये प्रति क्विटंलवर गेला होता. यानंतर आता केंद्रीय मंत्र्यांच्या समितीने बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच ३ लाख मेट्रिक टन कांद्याच्या निर्यातीला मान्यता दिली आहे. यासोबतच बांगलादेशमध्ये ५० हजार टन कांदा निर्यातीलाही मान्यता देण्यात आली आहे.

गेल्या वर्षी कांद्याने अश्रू आणले

गेल्या वर्षी अवकळीने कांद्याच्या उत्पादनावर चांगलाच मारा केला होता. अवकाळीमुळे कांद्याचे उत्पादन घटले होते. तर मोठ्या प्रमाणावर कांदा पिकाचे नुकसान झाले होते. बाजारात कांदा कमी आल्याने कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. हे भाव आटोक्यात आणण्यासाठी केंद्राने ८ डिसेंबर २०२३ रोजी कांदा निर्यातीवर बंदी घातली होती. तसेच ती ३१ मार्च २०२४ पर्यंत लागू केली होती. या बंदीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.

Onion Export Ban
Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीनी शेतकऱ्यांची केली माती; भारती पवारांचं आश्वासन खोटं ठरलं?

४० टक्के निर्यात शुल्क

सरकारने कांद्यावर ४० टक्के निर्यात शुल्क लावला होता. यामुळे जो काही थोडा फार कांदा निर्यात व्हायचा त्यावरही मर्यादा आल्या होत्या. याचा फटका कांदा उत्पादक शेकऱ्यांना बसला. यामुळे त्यांना शेतातील कांदा कवडी मोल भावाने विकावा लागला होता. तर निर्यातबंदीनंतर कांद्याच्या भावात घसरण सुरूच होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com