Onion Export Ban : कांदा निर्यातबंदीचा फायदा पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना

Onion Market : माझा शेतकरी उपाशीपोटी झोपत असताना पाकिस्तानातील शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा विकून मालामाल होत आहे.
Onion Market
Onion MarketAgrowon
Published on
Updated on

Pune News : माझा शेतकरी उपाशीपोटी झोपत असताना पाकिस्तानातील शेतकरी आंतरराष्ट्रीय बाजारात कांदा विकून मालामाल होत आहे. यामुळे पाकिस्तानी शेतकऱ्याचे कैवारी कोण? असा प्रश्‍न संसदेत उपस्थित करत, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्र सरकारने केलेल्या कांदा निर्यातबंदी बाबत सरकारला धारेवर धरले.

केंद्र सरकाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खासदार कोल्हे भाषणात म्हणाले, की राष्ट्रपतींनी राष्ट्रसर्वोपरी असल्याचे सांगितले. मात्र राष्ट्र हे केवळ इमारती, पायाभूत सुविधा आणि अर्थसंकल्पातील आकड्यांनी बनत नाही तर देशवासीयांच्या देशभक्तीने राष्ट्रनिर्माण होते. मात्र सध्या देशवासीय भीतीच्या वातावरणात जगत आहेत.

Onion Market
Onion Export Ban : केंद्र शासनाने कांदा निर्यातबंदी त्वरित मागे घ्यावी

माझ्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील शेतकरी कांदा निर्यातबंदीमुळे आणि बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे तणावग्रस्त आणि भीतीग्रस्त झाला आहे. जुन्नर वन विभागाअंतर्गत चार तालुक्यांमध्ये ४०० पेक्षा अधिक बिबटे असून, बिबट्यांच्या हल्ल्यात १८ हजारांपेक्षा अधिक पशुधन आणि गेल्या दोन वर्षांत २० ते २५ शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Onion Market
Onion Export Ban : त्वरित निर्यातबंदी उठवून शेतकऱ्यांना न्याय द्या

यामुळे भविष्यातील बिबट्यांपासून शेतकरी आणि पशुधन वाचवायचे असेल, तर बिबट्यांची नसबंदी करणे गरजेचे आहे. तसा प्रस्ताव वनविभागाने पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळावी आणि माझा शेतकरी भयमुक्त करावा.’’

कांदा निर्यातबंदी बाबत बोलताना कोल्हे म्हणाले, ‘‘कांदा निर्यात बंदीमुळे माझा शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. एकीकडे केंद्र सरकार पाकिस्तानचे कंबरडे मोडण्याचा वल्गना करत आहे. मात्र त्याच पाकिस्तान मधून युरोपला कांदा निर्यात होत असून, त्याचा फायदा पाकिस्तानच्या शेतकऱ्यांना होतो आहे. कंबरडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोडत आहे. यामुळे तत्काळ निर्यातबंदी हटवावी.

‘शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने घटतेय’

सरकार शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करत असताना, मात्र माझ्या शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपटीने घटत आहे. २०१३ मध्ये डीएपीची बॅग ५६० रुपयांना होती, तीच बॅग आता २०२४ मध्ये ११०० रुपयांना आहे. कांदा २० रुपये होता तोच कांदा आता ८ ते १० रुपये किलो आहे. सोयाबीन ६ हजार होते आता ते ४ हजार ५०० रुपये आहे. केंद्राच्या या धोरणांमुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्याऐवजी दुपटीने घटत आहे, असा घणाघात कोल्हे यांनी संसदेत केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com