Kisan Credit Card : शेतकऱ्यांना मिळणार अवघ्या १० मिनिटात १.५ लाखांचे कर्ज? 'या' जिल्ह्यांचा झाला समावेश

Agri Stack App : देशातील शेतकऱ्यांना आता काही मिनिटातच कर्ज मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने एक पथदर्शी कार्यक्रम आखला आहे. यात या कार्यक्रमात उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्याचा समावेश करण्यात आला आहे.
Agricultural credit
Agricultural creditAgrowon

Pune News : लोकसभा निवडणूकांच्या तोंडावर केंद्रातील मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना खूश करणाऱ्या अनेक घोषणा केल्या जात आहेत. यादरम्यान आता आणखी एका पथदर्शी कार्यक्रमाचा श्रीगणेशा करण्यात येणार आला आहे. या कार्यक्रमातून शेकऱ्यांना बँकांकडून १.५ लाख रूपये कर्ज उपलब्ध करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. हे कर्ज किसान क्रेडिट कार्ड आणि ॲग्री स्टॅक ॲपच्या मदतीने १० मिनिटात उपलब्ध होणार आहे. तर हा पथदर्शी कार्यक्रम देशातील उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र राज्यातील फारुखाबाद आणि बीड जिल्ह्यांत राबवला जाणार आहे.

काय आहे पथदर्शी कार्यक्रम?

देशातील शेतकऱ्यांना सहज आणि सुलभ कर्ज पुरवठा व्हावा. शेतकऱ्यांची बँकांच्या जाचक अटीतून सुटका व्हावी, यासाठी हा पथदर्शी कार्यक्रम राबवला जाणार आहे. तर देशातील पहिल्या पायलट कार्यक्रमात उत्तर प्रदेशमधील फारुखाबाद आणि महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. पथदर्शी कार्यक्रमात किसान क्रेडिट कार्ड आणि ॲग्री स्टॅक ॲप वापरले जाणार आहे.

Agricultural credit
Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्डवर मिळणार आता लाखो रुपयांचे बिनव्याजी कर्ज

अवघ्या दहा मिनिटांत कर्ज

या पथदर्शी कार्यक्रमाच्या माध्यमातून फारुखाबाद आणि बीड जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जाणार आहे. यासाठी किसान क्रेडिट कार्डच्या वापरासह ॲग्री स्टॅक ॲपची मदत घेतली जाणार आहे.

Agricultural credit
kisan credit card : नवे २० लाख शेतकरी बनले ‘केसीसी’धारक

यामुळे शेतकऱ्यांना अवघ्या १० मिनिटांत १.५ लाखांचे कर्ज उपलब्ध होणार आहे. विशेषबाब म्हणजे या कर्जासाठी शेतकऱ्यांना कोणतेही तारण ठेवावे लागणार नाही. यामुळे हे कर्ज विनातारण असेल. तर या पथदर्शी कार्यक्रमाचा श्रीगणेशा मे महिन्यापासून दोन्ही जिल्ह्यात केला जाणार आहे.

पिकांची अचूक माहिती

किसान क्रेडिट कार्ड आणि ॲग्री स्टॅक ॲपच्या माध्यमातून देशातील अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जाणार आहे. तसेच ॲग्री स्टॅक ॲपमध्ये येत्या खरीप हंगामापासून देशातील सर्व पिकांची माहिती नोंदविण्यात येणार आहे. यामुळे देशातील सर्व पिकांची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com