Economy : अटेन्शन इकॉनॉमी

Mobile Usage : नेटफ्लिक्सचे संस्थापक आणि सीईओ रीड हेस्टिंग्ज एकदा म्हणाले होते की, नेटफ्लिक्समध्ये आमची स्पर्धा ही ग्राहकांचा वेळ आणि अटेन्शन मिळवण्यासाठी सुरु आहे.
Economy
EconomyAgrowon

अमोल साळे

नेटफ्लिक्सचे संस्थापक आणि सीईओ रीड हेस्टिंग्ज एकदा म्हणाले होते की, नेटफ्लिक्समध्ये आमची स्पर्धा ही ग्राहकांचा वेळ आणि अटेन्शन मिळवण्यासाठी सुरु आहे. त्यामुळे आमच्या स्पर्धकांमध्ये इंस्टाग्राम, स्नॅपचॅट, यूट्युब, फेसबुक आणि झोप इ. आहेत.

यात ‘झोप’ हा शब्द वाचला का?

तुमची झोप कमी होत आहे का? स्मार्टफोनवर अनियंत्रित स्क्रोलिंग करत राहिल्यामुळे तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे का? तुमची विनाकारण चिडचिड होतेय का? या प्रश्नांची उत्तरे ‘अटेन्शन इकॉनॉमी’ समजून घेतल्यावर मिळू शकतील.

आज तुमचा वेळ आपल्या ॲप्स आणि वेबसाइटवर घालवण्यासाठी सर्व मोठे बिझनेस स्पर्धा करत आहेत. तुम्ही अधिकाधिक वेळ त्यांच्या ‘ॲप’वर घालावावा म्हणून ते नवनवीन क्लृप्त्या शोधत आहेत. तुमचा वेळ ही कमोडिटी म्हणजेच व्यापार करण्यायोग्य वस्तू बनली आहे. ती कशी ते समजून घेऊया.

Economy
Indian Economy : भारतातील आर्थिक विषमता सर्वोच्च टप्प्यावर

इंटरनेटवर दर मिनिटाला काय काय घडते?

गूगल : ६३ लाख सर्च होतात.

फेसबुक : ४० लाख पोस्ट लाइक होतात.

ट्वीटर: ३.६ लाख पोस्ट्स होतात.

इंस्टाग्राम: ७ लाख रील्स डायरेक्ट मेसेजमध्ये फॉरवर्ड होतात.

व्हॉट्सॲप : ४ कोटी १६ लाख मेसेज पाठवले जातात.

ई-मेल: २४.१ करोड इमेल पाठवले जातात.

यूट्युब: ८० वर्षे चालतील इतके व्हिडिओ पाहिले जातात.

अमेझॉन: ४ करोड रुपयांची विक्री होते.

भारताविषयी काही महत्त्वपूर्ण डेटा ः

- ७८ टक्के भारतीयांकडे फोन आहेत.

- दर तीन लोकांमागे एकजण सोशल मीडिया वापरतो.

- दररोज सरासरी ६ तास ४५ मिनिटे फोन वापरला जातो. (दिवसाच्या ४० टक्के)

- ८ सेकंदापेक्षा अधिक वेळ एका इंस्टाग्राम पोस्टवर कुणी थांबत नाही.

- मागील दोन दशकांत २५ टक्के पेक्षा अधिक एकाग्रता कमी झाली आहे.

- एखाद्या वेब पेजवर थांबण्याचा वेळ सरासरी २० सेकंदापेक्षाही कमी झाला आहे.

- फोन किंवा इतर स्क्रीन वापरण्याचे सरासरी प्रमाण वर्षानुवर्षे वाढत चालले आहे. लोक घराबाहेर पडत नाहीयेत. त्यामुळे मोकळी हवा, सूर्यप्रकाश मिळत नाहीये. यामुळे एक नवीन मानसिक आरोग्याची समस्या जन्म घेत आहे.

Economy
Changes of Economy : मोदी राजवट अन् अर्थव्यवस्थेतील बदल

यावर उपाय काय?

- स्क्रोल करणे थांबवा.

- फोन बाजूला ठेवा किंवा बंद करा. तुम्हाला खूप महत्त्वाचा फोन येईल आणि तो मिस होईल ही चिंता सोडा. तुम्ही कधीही कॉल बॅक करू शकता.

- घराबाहेर निघा, बागेमध्ये जा. फोनशिवाय लांब फेरफटका (लॉँग वॉक) मारून या.

- पुस्तके वाचा.

- समोर जिवंत व्यक्ती बसलेली असताना स्क्रिनमध्ये डोके घालून बसू नका.

- तुमच्या समोर बसलेल्या जिवंत व्यक्ती फोनवरच्या इतर व्यक्तींपेक्षा महत्त्वाच्या आहेत हे लक्षात घ्या. समोरच्या जिवंत व्यक्तींना पूर्ण अटेन्शन द्या.

खरं तर आपला फोन हा फोन नसून एक छोटा कॉम्पुटर आहे. जो तुम्हाला कंट्रोल करतो आहे. त्यात संभाषणासाठी फोन नावाचे एक ॲप आहे, ते तुम्ही खूप कमी वेळ वापरता. फोनमधील इतर गोष्टींवरच तुमचा जास्त वेळ खर्च होत आहे. तुम्ही फोनला पाळले आहे, की तुमच्या फोनने तुम्हाला पाळले आहे यावर विचार करा.

(लेखक आर्थिक विषयांचे अभ्यासक आहेत.)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com