Ahilyanagar News : विधानसभा निवडणूक मतदानामुळे यंदा साखर कारखाने उशिराने सुरू झाले आहेत. निवडणुकीची धामधूम संपल्याने ऊसतोडणी मजूर कारखान्यावर ऊसतोडणीला आले असल्याने साखर कारखान्यांचा परिसर गजबजला आहे. जागोजागी कारखाना परिसराला गावांचे स्वरूप आले आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाला आहे. यंदा विधानसभा निवडणूक मतदानामुळे यंदा साखर कारखाने उशिराने सुरू झाले. अनेक वर्षांनंतर यंदा ऊसतोड मजुरांना गावी दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली. आता दिवाळी सण घरी साजरा करून कामगारांचे जत्थे साखर कारखान्यांच्या परिसरात दाखल झाले आहेत.
साखर कारखान्याच्या मालकीच्या जागांवर परिसरात मजुरांच्या झोपड्या बसल्या आहेत. त्यामुळे परिसरात गजबज वाढली आहे. एकाच ठिकाणी हजारो कुटुंब राहत असल्याने या भागात मोठ्या प्रमाणात व्यवसायवृद्धी झाली आहे. सध्या किराणा, कापड दुकान, हॉटेल, चहा, नाश्ता, भाजीपाला, स्टेशनरी आदी दुकाने बहरली आहेत.
सर्व व्यावसायिक सीझनकरिता सज्ज झाले आहेत. कारखान्याच्या संपूर्ण सिझनमध्ये येथील अर्थकारण मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत होते. चार ते पाच महिन्यांची तयारी म्हणून सर्वांनी धान्य व संसारोपयोगी साहित्य आणले आहे. मुळा गट परिसरात एकाच ठिकाणी अनेक कुटुंब राहत असल्याने येथे सण, उत्सव या शिवाय संत वामनभाऊ व भगवान बाबांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.
अनेक कारखान्यांकडून मजुरांचे पाच ते सहा महिने वास्तव्य राहणार असलेल्या भागांत, मजुरांनी झोपड्या मांडलेल्या वस्तीत वीज, पाणी, रस्ते व सुरक्षा देण्याचा प्रयत्न झाला आहे. मजुरांनी संसार मांडलेल्या भागाला गावांचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.