Rabi Season 2024 : अति पावसामुळे रब्बीची पेरणी लांबणीवर

Rabi Sowing : खानदेशात ऑक्टोबरमध्ये सुरू होणारा रब्बी हंगाम यंदा अतिपावसाने लांबला आहे.
Rabi Sowing
Rabi SowingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात ऑक्टोबरमध्ये सुरू होणारा रब्बी हंगाम यंदा अतिपावसाने लांबला आहे. शेतकरी पेरणीचे नियोजन करीत आहेत, लागलीच पाऊस हजेरी लावत आहे. खानदेशात यंदा अपवाद वगळता सर्वच प्रमुख प्रकल्पांत १०० टक्के जलसाठा आहे.

पाण्याचा वापरही कमी आहे. कारण पाऊस सुरू आहे. नंदुरबार, धुळे व जळगावात १३० टक्क्यांवर पाऊस झाला आहे. जळगावचे पाऊसमान ६३२ मिलिमीटर, नंदुरबारचे ८५२ आणि धुळ्याचे पाऊसमान ५६५ मिलिमीटर आहे. सप्टेंबरमध्येच सर्वच जिल्ह्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला होता. नवरात्रोत्सवातही पाऊस झाला.

Rabi Sowing
Sangli Rabi Sowing : सांगलीत रब्बी पेरण्या लांबणीवर पडण्याची शक्यता

आता दिवाळीच्या तोंडावरही पाऊस सुरू आहे. खानदेशात उडीद, मूग, सोयाबीन, ज्वारी, मका आदी पिके घेतल्यानंतर त्यात कोरडवाहू व बागायती रब्बी पिकांची पेरणी केली जाते. ही पेरणी दसरा व दिवाळी सणाच्या तोंडावर केली जाते. परंतु यंदा पेरणी पावसाने रखडली आहे. खानदेशात यंदा रब्बीची पेरणी ११० टक्क्यांवर होईल, असे संकेत आहेत. परंतु पेरणीला यंदा उशिर झाला आहे.

तापी, गिरणा, पांझरा, अनेर आदी नद्यांच्या क्षेत्रातील काळ्या कसदार जमिनीत दसरा, दिवाळीलाच कोरडवाहू दादर ज्वारी, देशी हरभऱ्याची पेरणी करण्याचा प्रघात आहे. मागील हंगामात पाऊस कमी असतानाही या भागात अनेकांनी कोरडवाहू दादर ज्वारी, कोरडवाहू हरभरा पिकाची पेरणी दसरा सणालाच केली होती.

कोरडवाहू दादर ज्वारीसाठी खानदेशात अनेक शेतकरी क्षेत्र नापेर ठेवतात. या क्षेत्रात रब्बीतील पीक जोमात येते, उत्पादन चांगले व लवकर येते, असे शेतकरी मानतात. परंतु या नापेर क्षेत्रातही पावसामुळे वाफसा नाही. पूर्वमशागत रखडली आहे. ही मशागत होऊ शकत नाही. यामुळे पेरणीदेखील होऊ शकत नसल्याची स्थिती आहे.

Rabi Sowing
Rabi Sowing : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात रब्बीचा पेरा ३१ हजार हेक्टरवर

खानदेशात यंदा रब्बी हंगाम लांबल्याने बाजारातही बियाणे, खतांबाबत उलाढाल फारशी दिसत नसल्याची स्थिती आहे. मका बियाण्याला मध्यंतरी उठाव होता. परंतु हा उठावही कमी झाला आहे. कारण पेरणीचे नियोजन कोलमडले आहे.

दिवाळीनंतर पेरणीला गती शक्य

खानदेशात रब्बीची पेरणी पुढील महिन्यातच सुरू होईल, असे दिसत आहे. त्यात दिवाळी सणानंतर ही पेरणी गती घेईल. कारण काळ्या कसदार जमिनीत नीरभ्र वातावरण राहिल्यास किमान आठ दिवस वाफसा होणार नाही. शेतांत तण वाढले आहेत. हे तण नष्ट झाल्यानंतर शेत भुसभुशीत करावे लागेल. यानंतर पेरणी होईल. त्यासाठी चांगल्या वाफशाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com