Jal Jeevan Mission: ‘जलजीवन’चे मिशन कागदावर

Thane Water: पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण थांबावी, प्रत्यक्ष नळाद्वारे स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत ७२० योजनांची कामे हाती घेतली आहेत
Jal Jeevan Mission
Jal Jeevan MissionAgrowon
Published on
Updated on

Thane News: पाण्यासाठी महिलांची होणारी वणवण थांबावी, प्रत्यक्ष नळाद्वारे स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत ७२० योजनांची कामे हाती घेतली आहेत; मात्र ही कामे करताना वन विभाग, मालकी हक्काच्या जागांच्या परवानग्या, विद्युत महामंडळाची थकीत बिले आदी अडचणींचा सामना करावा लागत आहे.

परिणामी ४९६ योजना आजही रखडल्याची माहिती सामोर आली आहे. तसेच या योजनांच्या कामात दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ठाणे जिल्ह्यात २०१९ पासून केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत २०२४ अखेरपर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरात नळजोडणी करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट दिले आहे.

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission : लातूर जिल्ह्यातील गावागावांतील ‘जल जीवन’ला घरघर

या योजनेंतर्गत ७२० योजनांची कामे हाती घेतली आहेत. यामध्ये ४२० रेट्रोफिटिंग व ३०० नवीन योजनांचा समावेश आहे. यासाठी ७१५ कोटींचा आरखडा तयार केला आहे. केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबविण्यात येत असून, २०२४ अखेरपर्यंत ग्रामीण भागातील सर्व घरात नळजोडणी करण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे. 

Jal Jeevan Mission
Jal Jeevan Mission: चंद्रपुरात पाणीपुरवठा योजनांच्या फेरनिविदा

विविध कारणांमुळे योजनेला विलंब

ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाला जलजीवन मिशन योजना वेगाने राबविण्याच्या सूचना केल्या, मात्र जलजीवन मिशनअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांना स्थानिक अडचणी, जागांचे वाद, जलवाहिनी टाकण्यास येणाऱ्या जागांच्या अडचणी, निधीची उपलब्धता आदी कारणांमुळे विलंब होत आहे. 

नळ योजनांची थकबाकी

महाराष्ट्र विद्युत मंडळाकडे जुन्या नळ योजनांची थकबाकी, ग्रामपंचायतीकडील इमारतींची थकबाकी इत्यादी कारणांमुळे विद्युत कनेक्शन मिळण्यास येणाऱ्या अडचणींमुळे योजना अंतिम करण्यास विलंब होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com