Twin Tunnel Project : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे लवकरच काम

ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या बांधकामासाठी ११.८४ किमीच्या प्रत्येकी एका पॅकेजसाठी सर्वात कमी बोलीदार म्हणून लार्सन ॲण्ड टुब्रो आणि मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड या कंपन्यांना घोषित करण्यात आले आहे.
Twin Tunnel Project
Twin Tunnel ProjectAgrowon

Mumbai News : ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पाच्या बांधकामासाठी ११.८४ किमीच्या प्रत्येकी एका पॅकेजसाठी सर्वात कमी बोलीदार म्हणून लार्सन ॲण्ड टुब्रो आणि मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड या कंपन्यांना घोषित करण्यात आले आहे. परिणामी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याचे काम लवकरच सुरू होण्यास चालना मिळणार आहे.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पाअंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून १०.८ किमी लांबीचे दोन बोगदे आणि दोन्ही टोकांना एकत्रित एक किमीचे रस्ते बांधले जातील.

Twin Tunnel Project
Mumbai News : माथेरान मार्गावर धुराचे लोट

प्रत्येकी तीन मार्गिका असलेले दोन बोगदे चार मेगा टनेल बोरिंग मशीन वापरून पृष्ठभागाखाली जास्तीत जास्त २३ मीटर खोलीवर बांधले जातील आणि बोरिवलीमधील मागाठाणे परिसरातील एकतानगर आणि ठाण्यातील मानपाडा भागातील टिकुजिनी वाडी यांना जोडले जातील.

एमएमआरडीएने डिसेंबर २०२२ मध्ये दोन सिव्हिल पॅकेजअंतर्गत त्याच्या नागरी बांधकामासाठी चार वर्षे पूर्ण करण्याच्या मुदतीसह निविदा मागवल्या होत्या.

प्रकल्पाची एकूण अंदाजित किंमत १३,२०० कोटी रुपये इतकी आहे. लार्सन ॲण्ड टुब्रो आणि मेघा इंजिनिअरिंग ॲण्ड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड यांनी त्या कामासाठी स्वारस्य दाखविले होते. कामासाठीच्या तांत्रिक बोली एप्रिलच्या सुरुवातीला उघडण्यात आल्या होत्या.

त्यामध्ये दोन्ही कंपन्यांना सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले. पॅकेज १ मध्ये बोरिवलीपासून ५.७५ किमी अंतरासाठी सर्वात कमी बोली लावणारी कंपनी एल ॲण्ड टी ठरली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com