Burlap Bag Tenders : पंचवीस लाख बारदान्यांसाठी आलेल्या निविदा आज उघडणार

Tenders Opening : राज्यातील सोयाबीन खरेदी ठप्प असली तरी नव्याने निविदा प्रक्रिया राबविल्याने आठवड्याभरात खरेदी सुरू होण्याची चिन्हे आहेत. २५ लाख बारदान्यांसाठी कमी कालावधीतील निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, बुधवारी (ता. ७) निविदा उघडण्यात येणार आहेत.
Burlap Bag
Burlap BagAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील सोयाबीन खरेदी ठप्प असली तरी नव्याने निविदा प्रक्रिया राबविल्याने आठवड्याभरात खरेदी सुरू होण्याची चिन्हे आहेत. २५ लाख बारदान्यांसाठी कमी कालावधीतील निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून, बुधवारी (ता. ७) निविदा उघडण्यात येणार आहेत.

बारादान्याअभावी सोयाबीन खरेदी ठप्प झाल्याचे वृत्त ‘ॲग्रोवन’मधून प्रसिद्ध झाल्यानंतर पणनमंत्री जयकुमार रावल यांनी त्याची दखल घेतली. त्यानंतर ‘नाफेड’शी तातडीचा पत्रव्यवहार करून तीन दिवसांच्या कमी कालावधीची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.
राज्यातील सोयाबीन खरेदीच्या घोळामागे बारदान्याचा तुटवडा हे मोठे कारण आहे.

Burlap Bag
Agriculture Festival : ‘वाशिष्ठी’चा कृषी महोत्सव शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक

मात्र यामागे ‘नाफेड’च्या नियोजनाचा अभाव असल्याचेही समोर आले आहे. ‘नाफेड’ने राज्यातील सोयाबीनची संभाव्य खरेदी लक्षात न घेता गुजरातमधील शेंगदाणा खरेदीसाठी बारदाना पुरविला. त्यामुळे बारदान्याचा तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा पणन आणि मार्केटिंग फेडरेशनमध्ये सुरू आहे.

१९ नोव्हेंबर रोजी ‘नाफेड’कडे २० लाख बारदान्यांची राज्यातून मागणी करण्यात आली होती. त्यापैकी केवळ १७ लाख बारदाना पुरविण्यात आला. त्यानंतर मागणी करूनही गेल्या ४५ दिवसांपासून ‘नाफेड’ने मार्केटिंग फेडरेशनच्या मागणीकडे ढुंकूनही पाहिले नाही. परिणामी, राज्यातील बहुतांश ‘नाफेड’च्या खरेदी केंद्रांवर सोयाबीन खरेदी बंद करावी लागली होती. या बाबतची वस्तुस्थिती ‘ॲग्रोवन’मधून मांडल्यानंतर मार्केटिंग फेडरेशनने २५ लाख नवा बारदाना आणि जुन्या बारदान्यांसाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे.

Burlap Bag
Farmer Loan waiver : शेतकरी कर्जमाफीचा महायुतीला विसर; शेतकऱ्यांची मात्र आग्रही मागणी

यासाठी सहा निविदा आल्या असून त्याच्या तांत्रिक बाबी तपासण्यात येत आहेत. बुधवारी निविदा उघडण्यात येणार असून कंत्राटदार निश्‍चित झाल्यानंतर बारदान्याचा मार्ग मोकळा होणार आहे.
गुजरातमध्ये शेंगदाणा खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात बारदाना पुरविण्यात आला आहे. किंबहुना, ‘नाफेड’ची संपूर्ण यंत्रणाच त्यासाठी कामाला लागल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश खरेदी केंद्रांवर बारदानाच मिळाला नाही.

जुन्या, नव्या बारदान्यांचा घोळ

ज्यूटपासून तयार झालेला बारदाना सोयाबीनसाठी वापरला जातो. जुना बारदाना वापरल्यास त्यातून गळतीचे प्रमाण वाढते. नव्या बारदान्याला हुक लावल्याने किंवा वाहतूक केल्याने त्यातून सोयाबीन गळती होते. मात्र जुना बारदाना खरेदी करावा आणि ती प्रक्रिया राज्याच्या पातळीवर राबविली जावी यासाठी मोठी यंत्रणा कार्यरत आहे.

दोन वर्षांपूर्वी हरभरा खरेदीसाठी ठरावीक कंत्राटदाराकडून बारदाना खरेदी करावा यासाठी मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांवर शिवसेनेच्या एका मंत्र्याने प्रचंड दबाव आणला होता. या दबावाला न जुमानल्याने संबंधित मंत्र्याने अर्वाच्य भाषेत शिव्या देऊन दमही दिला होता. या मंत्र्याला एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता. मात्र पुन्हा सत्तेत आल्यानंतर भात खरेदीतील बारदाना हरभरा खरेदीला वापरावा यासाठी दबाव आणला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com