Jowar Sowing
Jowar SowingAgrowon

Jowar Sowing : कळंबा परिसरात ज्वारी लागवडीकडे कल

Rabi Season : कळंबा शेती गटाअंतर्गत चाळीस गावांमध्ये यंदाच्या रब्बी हंगामात सातशे हेक्टरमध्ये विविध पिकांची लागवड केली जाणार आहे.
Published on

Kolhapur News : कळंबा शेती गटाअंतर्गत चाळीस गावांमध्ये यंदाच्या रब्बी हंगामात सातशे हेक्टरमध्ये विविध पिकांची लागवड केली जाणार आहे. प्रामुख्याने पाऊणेपाचशे हेक्टरमध्ये ज्वारीची लागवड केली जाणार असून, फूलशेती व ग्रीन हाऊस याचेही यंदा प्रमाण वाढले आहे.

कृषी विभागाने शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे पुरवण्यासाठी व शेतीपूरक मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. यंदाच्या पावसाळ्यात कळंबा तलावासह परिसरामधील विहिरी, कूपनलिका, बंधाऱ्यांमध्ये मुबलक पाणीसाठा झाला असून रब्बी हंगामाला लाभ होणार असल्याचे चित्र आहे.

Jowar Sowing
Jowar Sowing : नांदेड जिल्ह्यात ज्वारीच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय घट

पाऊस थांबल्यामुळे कळंबा शेती गटाअंतर्गत चाळीस गावांमध्ये भात, सोयाबीन कापणी, मळणीला वेग आला आहे. मजुरांची टंचाई असल्यामुळे यंत्राच्या साहाय्याने भात, सोयाबीनची मळणी केली जात असून येथील अनेक शेत-शिवार व कोल्हापूर-गारगोटी राज्य महामार्गालगत भात, सोयाबीनची मळणी केली जात असल्याचे दिसत आहे.

Jowar Sowing
Jowar Sowing : गडहिंग्लजमध्ये रब्बीची चाहुल; ज्वारीची पेरणी सुरू

याशिवाय, आगामी रब्बी हंगामासाठी शेतीच्या मशागतीची कामे सुरू केली आहेत. पेरणीसाठी संकरित व घरच्या बियाण्यांचा वापर सुरू आहे. बाजारामध्ये दिवसेंदिवस ज्वारीचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे यंदाच्या रब्बी हंगामात येथील शेतकऱ्यांनी पाऊणेपाचशे हेक्टरमध्ये ज्वारी पिकाची लागवड करण्याचे नियोजन केले आहे.

तसेच बाजारामध्ये तेलाचे दर वाढल्याने उन्हाळी सोयाबीन पीक घेण्याकडेही शेतकऱ्यांचा कल आहे. सुमारे ५० हेक्टरमध्ये त्याची लागवड केली जाणार आहे. तसेच गहू, हरभरा, मका, कांदा, बटाटा, भाजीपाला यांसह अनेक पिकांची १६५ हेक्टरमध्ये लागवड केली जाणार आहे.

रब्बीत घेतली जाणारी पिके क्षेत्र हेक्टरमध्ये

ज्वारी - ४८६, गहू - १०, भाजीपाला - ४७, हरभरा - ६०, सोयाबीन - ५०, मका - ३५, फुले - १५, ग्रीन हाऊस - ३, कांदा-बटाटा - ४.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com