Agriculture Share : शेती निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल

Agriculture Update : जिरायती क्षेत्राबरोबरोबरच बागायती क्षेत्रदेखील लीजवर अथवा निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, उत्पादन खर्चापेक्षा लागवड खर्च अधिक झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जिरायती क्षेत्राबरोबरोबरच बागायती क्षेत्रदेखील लीजवर अथवा निम्म्या हिश्‍शाने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, उत्पादन खर्चापेक्षा लागवड खर्च अधिक झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बेमोसमी पाऊस, गारपीट, कमी पर्जन्यमान या नैसर्गिक संकटांबरोबरच मानवनिर्मित संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यातच उत्पादन खर्च अधिक तर उत्पन्न कमी असा दृष्टचक्रात शेती व्यवसाय सापडला आहे.

वाढत्या महागाईत शेतीकामासाठी लागणाऱ्या सालगड्यांच्या मजुरीने लाखांचा टप्पा पार केला आहे. ग्रामीण भागात मजुरांची संख्या भेडसावत आहे. शेतकरी बैलबारदाना मोडून शेती जुपने (मक्त्याने) अथवा हिश्‍श्‍याने देण्याकडे पुढे सरसावले आहेत. शेतकऱ्यांचे नववर्ष हे गुढीपाडव्याला असते. याच दिवशी सालगडी ठेवणे, शेती वाट्याने देणे असे शेतीचे वार्षिक नियोजन केले जाते,

Agriculture
Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

शेती संदर्भातील नियोजन गुढीपाडव्यालाच केले जाते. परंतु गेल्या काही वर्षांपासून बी-बियाणे, रासायनिक खते यांचे वाढते दर, मजूर टंचाई, रोजगाराची वाढती स्पर्धा, लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, सालगड्यांची वाढलेली मजुरी, निसर्गावर आधारित शेती, विविध नैसर्गिक संकटे आदी अनेक समस्यांच्या दुष्टचक्रात शेती सापडल्याने शेतकरी चिंतित असल्याचे चित्र आहे.

सर्व समस्यांना वैतागून अनेक शेतकरी आपला बैलबारदान मोडीत काढून शेती हिश्‍शाने अथवा मक्त्याने देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. सालगडांची मजुरी वाढत आहे. परंतु शेतीतील उत्पन्नात पाहिजे तशी वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दररोज किमान ४०० रुपये मजुरी मिळावी, अशी मजुरांची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे शेतकरी संकटात सापडला आहे.

Agriculture
Agriculture Corporation : महामंडळातर्फे शेतीमालाचे वितरण

ट्रॅक्टरचा वापर वाढला

भाकड जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवला जात आहे. बैलबारदाना कमी करून शेती ट्रॅक्टरच्या मदतीने करण्याचा प्रयोगही अनेकजण करीत आहेत. शेती कामात ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने दिसून येत आहे. जास्त पैसे खर्च झाले तरी शेती कामे लवकर होतात म्हणून तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे म्हैस, गाई, वासरे, कालवडी, गोऱ्हे यांची बाजारात कवडीमोल दरात विक्री करताना शेतकरी दिसत आहेत.

पशुधन घटले

तालुका दुधाच्या उत्पनात अग्रेसर होता. मात्र अनेक वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळे तालुक्यातील पशुधनात घट होताना दिसून येत आहे. पूर्वी ज्यांच्याकडे एक किंवा दोन बैलजोड्या, गाई, म्हशी जनावरे जास्त तो शेतकरी श्रीमंत समजला जाई. परंतु अलीकडे मजुरी वाढल्याने, चाराटंचाई, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे जनावर कमी करण्याचा सपाटा शेतकरी लावत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे एखादी बैलजोडी, एखादी गाय-म्हैस दुधासाठी ठेवतानाही शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com