Self Help group : बचत गटाची दहा सूत्रे

Bachat Gat : बचत गटाला मोठं करण्यात महिलांचा सर्वात मोठा वाटा आहे, कारण बचत गटाच्या माध्यमातून महिला आणि व्यवसाय यांची जणू एक चळवळच उभी राहिलेली आहे.
Women Self- Help Group
Women Self- Help GroupAgrowon
Published on
Updated on

डॉ. सुमंत पांडे :

महिला स्वयंसाह्यता गटांच्या माध्यमातून गावातून संस्कारक्षम, कार्यप्रवण आणि विश्‍वासार्ह समाज निर्मितीचा प्रयत्न होत आहे. त्याला अपेक्षित प्रतिसादही मिळत आहे. संस्कारक्षम यासाठी की नियमित होणाऱ्या बैठकांमधून आणि संवादातून त्यांच्यामध्ये एकमेकांबद्दल संवेदना आणि सहकार्याची भावना निर्माण होते. एकमेकांच्या दुःखात आणि कठीण प्रसंगात साह्य करण्यासाठी बचत गटांसाठी संस्था आपल्याला सदैव मदत करण्यासाठी तयार आहे, ही भावनाच केवळ

सुखावून जाते. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी हा खरा पहिला टप्पा होय. या दहा सूत्रांमध्ये गुंफून त्यावर आधारित गटांवर संस्कार होतात

  • नियमित बैठक.

  • नियमित बचत.

  • आवश्यकतेनुसार अंतर्गत देवाण-घेवाण.

  • कर्जाची नियमित परतफेड.

  • सर्व बाबींची नोंद ठेवणारी लेखे अद्ययावत असणे.

  • गुणवत्ता पूर्ण शिक्षण.

  • आरोग्याची सुविधा.

  • पंचायत राज संस्थांची समन्वय.

  • शासकीय योजना.

  • शाश्‍वत उपजीविका.

Women Self- Help Group
Womens Self Help Group : महिला बचत गट करतील गावाला गरिबीमुक्त

नियमित बैठक

स्थापन झालेल्या महिला गटांच्या नियमित बैठका हा त्यांचा एकत्र आणि अभेद्य राहण्यासाठीचा पाया होय. बैठक आळीपाळीने सर्व सदस्यांच्या घरी होते.

नियमित बचत

नियमित बैठकांना येणाऱ्या महिलांनी आपली मासिक अथवा आठवड्याची बचत स्वयंसाह्यता गटाच्या खजिनदाराकडे बैठकीच्या वेळी देणे गरजेचे आहे.

अंतर्गत देवाणघेवाण

सर्व स्वयंसाह्यता गटातील महिलांकडून जमा झालेले पैसे एकत्र करून ज्यांची गरज अधिक आहे आणि ज्यांच्या गरजेचे कारणही प्राधान्यक्रमाने आहे, अशा महिलांना प्राधान्याने अल्प व्याजदरात स्वयंसाह्यता गटांच्या माध्यमातून कर्ज देण्यात येते.

नियमित परतफेड

अशाप्रकारे घेतलेल्या कर्जाचा हप्ता देखील बचतीच्या बरोबर नियमितपणे परतफेड करणे गरजेचे आहे, त्या हप्त्याची ठरवून दिलेली रक्कम व्याजासह बैठकीच्या वेळी गटातील महिलांनी एकत्र घेऊन येणे गरजेचे आहे

वरील चारही टप्प्यांमध्ये गटांमध्ये बैठकीतून होणाऱ्या चर्चेमधून त्यांच्या क्षमता विकसित आणि वृद्धिंगत होतात. उदाहरणार्थ, आठवड्याला एक बैठक या पद्धतीने वर्षातील एकूण ५२ बैठका होतात. प्रत्येक बैठक किमान ४५ मिनिटे ते एक तास चालत आहे असे गृहीत धरल्यास ५२ तासांची चर्चा होते. यामधून ज्ञान आणि कौशल्यामध्ये निश्‍चित भर पडते. या बैठकांमधून केवळ धन व्यवहारच नव्हे तर मनाचे व्यवहारदेखील होत असतात.

गटातील कोणाला दुःख आहे का? कोणी अडचणीत आहे का? घरी कोणी आजारी आहे का? अशा प्रकारच्या अडचणी सुरुवातीलाच विचारण्यात येतात, सर्व महिला त्याच गावात आणि शक्यतो त्याच वाडी वस्तीवर राहणारे असल्यामुळे त्यांचे दुःख आणि अडचणी लगेचच लक्षात येतात. गटांच्या बैठकीच्या वेळी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतात. बहुतेक वेळेस आर्थिक विवंचना आणि पतींची / मुलांची व्यसनाधीनता हा एक मोठा प्रश्‍न असतो. आरोग्याच्या प्रश्‍नांची देखील वाढ होते आहे.

अद्ययावत लेखे

स्वयंसाह्यता गटामधील एकसंधता आणि विश्‍वास टिकून राहण्यासाठी व्यवहारामध्ये पारदर्शकता असणे अनिवार्य आहे. यासाठी त्यांनी कष्टाने आणि स्वर्जीत पैशातून जमा केलेली मदत योग्य ठिकाणी असावी ही माफक अपेक्षा असते.

जमा झालेल्या पैशाची नोंद वहीत योग्य पद्धतीने ठेवणे गरजेचे राहते.

परतफेड करून जमा झालेली रक्कम त्या महिलेच्या नावासमोर नोंदविण्यात येते.

जमा झालेले पैसे आवश्यकतेनुसार आपापसांत वाटण्यात येतात.

शिल्लक रक्कम राहिल्यास बँकेमध्ये भरण्यात येतात. बँक गावापासून दूर असल्यास बँक सखी अथवा बिझनेस करस्पॉन्डंट यांच्या

  माध्यमातून बँकेचे व्यवहार करण्यात येतात. ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चांगली सुविधा पुरविलेली आहे.

धन व्यवहारात प्रत्येकाचे हिशेब चोख ठेवणे आणि प्रत्येक बैठकीमध्ये नोंदवही प्रत्येकाला वाचनासाठी देण्यात येते. बऱ्याच

  ठिकाणी त्यांचे सामूहिक वाचन करण्यात येते.

प्रत्येक सदस्याला बचतीचे पासबुक देण्यात येते.

स्वयंसाह्यता गटांचे बँकेतील पासबुकही त्यांना अवलोकनासाठी देण्यात येते. यामुळे स्वयंसाह्यता गटांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये

  विश्‍वास निर्माण होतो. त्यांची एकजूट अजून मजबूत होते.

धनव्यवहारासोबत मन व्यवहारही तेवढेच महत्त्वाचे आहेत, किंबहुना बऱ्याच अंशी मन व्यवहाराचाच अग्रक्रम असतो.

डॉ. सुमंत पांडे

माजी कार्यकारी संचालक, जलसाक्षरता केंद्र, यशदा, पुणे

९७६४००६६८३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com