Bharari Pathak : कृषी निविष्ठा वितरण, गुणवत्ता नियंत्रणासाठी दहा भरारी पथके

Kharif Season : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या कृषी निविष्ठांचे योग्य प्रमाणात वितरण व गुणवत्ता नियंत्रण राखण्यासाठी जिल्हास्तरावर एक व तालुका स्तरावरून दहा भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
Fertilizer
Fertilizer Agrowon
Published on: 
Updated on: 

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पुरविल्या जाणाऱ्या कृषी निविष्ठांचे योग्य प्रमाणात वितरण व गुणवत्ता नियंत्रण राखण्यासाठी जिल्हास्तरावर एक व तालुका स्तरावरून दहा भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी ६ लाख ७५ हजार हेक्टर सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६ लाख ७८ हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील विविध पिकांची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

प्रस्तावित करण्यात आलेल्या पीक पेरणीमध्ये कपाशीचे क्षेत्र सर्वाधिक ३ लाख ८२ हजार हेक्टर राहण्याचा अंदाज असून मका व बाजरी या पिकाचे अनुक्रमे १ लाख ७४ हजार हेक्टर व २२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित आहे.

जिल्ह्यात बियाण्याचा सरासरी वापर ३४,४८२ इतका आहे. येत्या खरीप हंगामासाठी ३९ हजार १०३ क्विंटल बियाण्याची मागणी आहे. वेळेत बियाणे विक्रेत्यांकडे व त्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याच नियोजन आहे.

Fertilizer
Kharif Season Update : सांगोल्यात खरिपाच्या कामांची लगबग

खरीप हंगामात रासायनिक खतांचा सरासरी वापर २ लाख ७३ हजार ६२० टन एवढा असून येत्या खरीप हंगामासाठी तीन लाख ८ हजार ९६८ खताची मागणी नोंदविण्यात आली आहे. दोन लाख ७३ हजार ६२० रासायनिक खतांचे आवडतं शासनाकडून प्राप्त झाले होते. शेतकऱ्यांना उत्तम दर्जांची बियाणे रासायनिक खते व कीटकनाशके पुरविली जावी याची जबाबदारी कृषी विभागाची आहे.

त्यामुळे कृषी निविष्ठांचे योग्य प्रमाणात वितरण व गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात दहा भरारी पथकांची स्थापना केली आहे. याशिवाय जिल्हा तसेच सर्व तालुका कार्यालय या ठिकाणी शेतकऱ्यांच्या निविष्ठाविषयक तक्रारी स्वीकारण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.

जिल्ह्यात उपलब्ध ३० गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक मार्फत योग्य नियंत्रण राखण्यासाठी नियोजन करण्यात आले आले आहे. सद्यःस्थितीत खत बियाणे उपलब्धता साठा याची गोडाऊन तपासणी पथकांमार्फत सुरू असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

नियोजनानुसार प्रत्यक्ष विक्रेत्यांकडे खत बियाण्यांची उपलब्धता करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना उत्तम दर्जाच्या कृषी निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोणताही गैरप्रकार खपवून घेतला जाणार नाही. तशी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. अधिनस्त यंत्रणेलाही तसे सूचित केले आहे.
प्रकाश देशमुख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, छत्रपती संभाजीनगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.