Leopard Attack : बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा

Ajit Pawar : बिबट्यांकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक मंगळवारी (ता.२८) मंत्रालयात बोलविली होती.
Leopard Attack
Leopard AttackAgrowon
Published on
Updated on

Pune News : उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव शिरूर या तालुक्यांमधील अति तीव्र झालेला मानव बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी दिवसा थ्री-फेज विद्युत पुरवठ्याचा प्रस्ताव ऊर्जा सचिव आभा शुक्ला यांनी ऊर्जा विभागाला सादर केला असून, त्यावर तातडीने निर्णय होणार असून, बिबटे पकडण्यासाठी ३०० पिंजरे खरेदी करण्यासाठी विशेष निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्‍वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्याची माहिती माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मंत्रालयात माध्यमांना दिली.

बिबट्यांकडून होणारे हल्ले रोखण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीची बैठक मंगळवारी (ता.२८) मंत्रालयात बोलविली होती. बैठकीला शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, भाजपच्या नेत्या आशाताई बुचके, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आदी लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

या वेळी बैठकीची माहिती आढळराव पाटील यांनी माध्यमांना दिली. आढळराव पाटील म्हणाले, ‘‘उत्तर पुणे जिल्ह्यातील दाट ऊस शेतीमुळे बिबट्यांची संख्या वाढली असून, मानवी वस्तीत बिबट्यांच्या वावरामुळे मानवी हल्ले वाढत आहेत. हे हल्ले रोखण्यासाठी माजी आमदार शरद सोनवणे यांनी ५ दिवस उपोषण केले होते.

Leopard Attack
Leopard Attack : वन विभागाचे अधिकारीही बिबट समस्येमुळे हतबल

उपोषणा दरम्यान सोनवणे यांनी विविध मागण्या केल्या होत्या. त्यांच्या आणि वन विभागाच्या मागण्यांनुसार बिबटे पकडण्यासाठी ३०० पिंजऱ्यांची खरेदी करणे, बिबट्या निवारा केंद्राची क्षमता तीन महिन्यांत १०० बिबट्यांची करणे, शेतकऱ्यांनी दिवसा थ्री-फेज विद्युत पुरवठा करणे, मानवी वस्तीतील बिबटे सरसकट पकडणे आदी विविध कामांना तातडीच्या मंजुऱ्या देण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.’’

गुन्हे मागे घेण्यासाठी गृहविभागासोबत चर्चा होणार

बिबट्या समस्या प्रश्‍नी आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांच्या झटापटीत महिला वनरक्षक गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या स्वरयंत्राला गंभीर जखम झाली असून, या प्रकरणी काही शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हे गुन्हे मागे घेण्यासाठी गृह विभागासोबत चर्चा होऊन, गुन्हे मागे घेतले जातील. तोपर्यंत शेतकऱ्यांना अटक होणार नाही असे आश्‍वासन अजित पवार यांनी दिल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.

Leopard Attack
Junnar Leopard Attack : बिबट्यांना पकडण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा

हॉटस्पॉटच्या ठिकाणी विशेष पथकांची नियुक्ती

बिबट्यांची संख्या ज्या गावांमध्ये जास्त आहे, अशा ठिकाणी इतर तालुक्यांचा वनविभागाच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून, विशेष पथके निर्माण केली जाणार आहेत.

मेंढपाळांना मोठ्या आवाजाच्या बंदुका देणार

जिल्हा आपत्ती निवारण निधीतून मेंढपाळांना मोठ्या आवाजाच्या बंदुकांसह विशेष तंबू देण्याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी सादर करावे. त्याप्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली जाईल असेही अजित पवार यांनी सांगितल्याचे आढळराव पाटील यांनी सांगितले.

कार्यक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार

उपोषणकर्ते शरद सोनवणे यांनी उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. मात्र यांचे निलंबन न करता त्यांच्या जागी बिबट्या समस्या निवारणाचा अनुभव असलेल्या माजी वनाधिकारी अशोककुमार खडसे यांच्यासारख्या कार्यक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत चर्चा झाली, याबाबत मुख्य सचिव आणि वनमंत्र्यांशी चर्चा करून आचारसंहितेनंतर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल असे आढळराव पाटील यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com