
Nanded News: नांदेड जिल्ह्यात एप्रिल उजाडताच कमाल तापमानाचा पारा ४१.५ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३.८ अंश सेल्सिअसवर पोहोचल्यामुळे उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवत आहेत. यामुळे शेतीकामावर वितरीत परिणाम होत असल्याने मजूर सकाळी सात ते दुपारी एकपर्यंतच काम करीत आहेत.
नांदेड जिल्ह्यात दरवर्षी उन्हाळा अधिक कडक असतो. यंदाही तो अधिक कडक जाणवेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. जिल्ह्यात मार्चमध्ये कमाल तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. परंतु एप्रिल महिना सुरू होताच यात भर पडून सध्या ४१.८ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
किमान तापमानही २३.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले तर हवेतील आर्द्रतेचे प्रमाण ४८ टक्के आहे. यामुळे सध्या उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. उन्हाळ्याचे आणखी दोन महिने शिल्लक असल्याने मे महिन्यात तापमान यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम शेतीकामावर दिसून येत आहे.
सध्या अनेक शेतकरी हळद पिकाची काढणी करून त्यावर प्रक्रिया करण्याच्या कामात आहेत. उन्हापासून बचाव होण्यासाठी बागायती पिके, भाजीपाला, फळपिकांच्या कामासाठी लागणारे मजूर सकाळी सात ते दुपारी एक या वेळेत काम करण्याला प्राधान्य देत आहेत.
अवकाळीचा गारवा गेला
मागील आठवड्यात जिल्ह्यात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला होता. काळात जिल्ह्यात दोन-तीन दिवस ढगाळ वातावरण होते. यामुळे कमाल तापमान ३५ अंशांपर्यंत खाली घसरले होते. या वेळी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली होती. परंतु हे अवकाळीचे ढग गेल्यावर तापमानाने आपली गती पुन्हा एकदा पकडली आहे. चाळीस अंशांच्या पुढे गेलेल्या तापमानाचा फटका सध्या अनेकांना बसत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.