Tembhu Yojana : ‘टेंभू’चा डावा कालवा खोडसाळपणामुळे फुटला

Tembu Scheme : टेंभू योजनेचे माहुली पंप हाउसमधून पाणी उचलून देवीखिंडी बोगद्यातून घाणंद तलावात येते. घाणंद तलावात पाणी साठवून डावा व हिवतड कालव्याला सोडले जाते.
Canal Burst
Canal Burst Agrowon
Published on
Updated on

Aatpadi Tembhu Yojana : टेंभू योजनेच्या डाव्या कालव्यातून दिघंचीला सोडलेले पाणी अनोळखी व्यक्तीने बंद केल्याने पाण्याचा फुगवटा होऊन पारेकरवाडी येथे डावा कालवा फुटला. त्यातून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. आमदार सुहास बाबर यांनी त्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कालवा दुरुस्तीसाठी ‘टेंभू’ची यंत्रणा कामाला लावली आहे.

टेंभू योजनेचे माहुली पंप हाउसमधून पाणी उचलून देवीखिंडी बोगद्यातून घाणंद तलावात येते. घाणंद तलावात पाणी साठवून डावा व हिवतड कालव्याला सोडले जाते. या दोन मुख्य कालव्यांवर जागोजागी बंदिस्त वितरिका जोडल्या आहेत. या वितरिकांमधून कालव्याखालील पूर्वेकडील गावांना पाणी सोडले जाते.

गेल्या आठवड्यात दिघंचीला डाव्या कालव्यातून बंदिस्त वितरिकेमधून पाणी सोडण्यात आले होते. चार दिवस पाणी सुरळीत होते, मात्र अनोळखीने दिघंचीला पाणी जाणारी वितरिका बंद केली. त्यामुळे डाव्या कालवा पाण्याचा फुगवटा वाढून पारेकरवाडी येथे फुटला. कालव्याला भगदाड पडले. दोन दिवस फुटलेल्या कालव्यातून लाखो लिटर पाणी वाहून वाया गेले. अनोळखीने जाणूनबुजून हा प्रकार केल्याची चर्चा आहे.

Canal Burst
Tembhu Canal Burst : हटकर मंगेवाडीत टेंभूचा कालवा फुटला; लाखो लिटर पाणी वाया

अनोळखी व्यक्तीने खोडसाळपणाने दिघंचीचा व्हॉल्व्ह बंद केल्याने कालवा फुटला आहे. प्रशासनाने प्रत्येक ठिकाणी व्हॉल्व्हला लॉक करण्याची यंत्रणा बसवावी. त्यामुळे असे प्रकार होणार नाहीत, शिवाय पाणी वितरणाला शिस्त लागेल.

- बाळासाहेब होनराव, शेतकरी, दिघंची

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com