Raghunath Dada Patil : रघुनाथदादा पाटील भारत राष्ट्र समितीत दाखल

Team Agrowon

 शेतकरी संघटनेचे नेते

शेतकरी संघटनेचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील हे तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षात दाखल झाले आहेत.

BRS | Agrowon

किसान सरकार

तेलंगणानंतर महाराष्ट्रात ‘किसान सरकार’ स्थापनेसाठी प्रयत्नशील असलेले केसीआर यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

BRS | Agrowon

एकत्रित भोजन

तर मंगळवारी (ता. १) केसीआर यांनी पाटील यांच्या साखराळे (इस्लामपूर) येथील निवासस्थानी एकत्रित भोजन केले.

BRS | Agrowon

तब्बल सात तास बैठक

शेतकरी संघटनेचे संस्थापक दिवंगत शरद जोशी यांच्यासोबत काम केलेले आणि त्यांचा वारसा पुढे चालविणारे रघुनाथदादा पाटील यांची नुकतीच हैदराबाद येथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्यासोबत तब्बल सात तास बैठक झाली.

BRS | Agrowon

शरद जोशी यांनी मांडलेला शेतीचा सिद्धांत

या बैठकीत दिवंगत शरद जोशी यांनी मांडलेला शेतीचा सिद्धांत आणि विविध शेतकरी कायद्यांवर सविस्तर चर्चा झाली.

BRS | Agrowon

शेतकरी आत्महत्या वाढत आहेत

अनेक कायदे शेतकरीविरोधी असल्याने शेतकरी आत्महत्या वाढत आहेत. शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी केसीआर तेलंगणामध्ये विविध शेतकरी हिताच्या योजना राबवित आहेत.

BRS | Agrowon
Sitafal | Agrowon