Farm Road Issue : महसूल विभागामुळे शेतरस्त्यांचे वाद मार्गी

Revenue Department : शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला व विश्वासात घेत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Farm Road Issue
Farm Road Issue Agrowon
Published on
Updated on

Washim News : तालुक्यातील पाणंद रस्त्यासह वहिवाटीचे रस्ते शेतकऱ्यांमध्ये कोणताही वाद व भेदभाव निर्माण न होऊ देता मोकळे करण्यात आले आहेत. येथील तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या प्रयत्नाने व प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या पुढाकारात पाणंद रस्त्याचे प्रश्‍न सोडविण्यात आले.

पाणंद रस्त्याचा व वहिवाटीच्या रस्त्यांचा विषय अतिशय गंभीर होत चालला असल्याचे तहसीलदार तेजनकर यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ महसूल कर्मचाऱ्यांच्या मदतीने तालुक्यातील खडकी सदार ते देगाव हा पाणंद रस्ता, मोरगव्हाण येथील वहिवाट रस्ता, त्याचप्रमाणे मोरगव्हाण येथील अज्ञात व्यक्तीकडून शेतकऱ्यांच्या धुऱ्यावर मोठा खड्डा पाडून शेतकऱ्यांमध्ये वाद निर्माण होईल असे कृत्य करून बंद केलेला रस्ता तसेच कन्हेरी येथील वहिवाट बंद असलेला रस्ता, अशा विविध रस्त्यांच्या प्रश्‍नांबाबत महसूल प्रशासनाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला.

Farm Road Issue
Farm Road: पुणे जिल्ह्यातील ५३८ पाणंद रस्ते खुले : जिल्हाधिकारी डुडी

रस्त्यासंदर्भात कोणताही वाद उद्भवू नये म्हणून या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन या रस्त्यांचे महत्त्व पटवून दिले. शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला व विश्वासात घेत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Farm Road Issue
Farm Road Issue : लातूर तालुक्यातील १०५ शेतरस्त्यांसाठी ‘स्पॉट व्हिजिट’

मागील अनेक वर्षांपासून खडकी सदार ते देगाव हा बंद असलेला पाणंद रस्ता मोकळा करण्यात आला. मोरगव्हाण येथील शोभा तानाजी कोकाटे यांचा वहिवाट रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता तो मिटविण्यात आला. कन्हेरी येथील महादू गवई यांचा वहिवाट रस्ता मोकळा करण्यात आला.

या वेळी महसूल प्रशासनाचे नायब तहसीलदार टी. डी. कुळमेथे, गजानन जवादे, मंडळ अधिकारी समाधान जावळे, यू. एस. नप्ते, पटवारी के. पी. डुकरे पाटील, सुदाम जाधव, किशोर अवचार, अजय मानवतकर यांच्यासह महसूल प्रशासनाचे महसूल सेवक, महसूल सहायक सेवक, कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com