Fruit Crop Production : फळ पिकापासून अधिक उत्पादन घेण्याचे तंत्र आत्मसात करावे

Dr. Indra Mani : मराठवाड्यात आंबा फळ पिकाचे क्षेत्र वाढत आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. या फळ पिकापासून अधिक उत्पादन घेण्याचे तंत्र शेतकरी बांधवांनी आत्मसात करावे.
Dr. Indra Mani
Dr. Indra ManiAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यात आंबा फळ पिकाचे क्षेत्र वाढत आहे. ही अतिशय चांगली बाब आहे. हे फळ म्हणजे फळाचा राजा. या फळ पिकापासून अधिक उत्पादन घेण्याचे तंत्र शेतकरी बांधवांनी आत्मसात करावे. यासाठीच आयोजित प्रशिक्षण कार्यक्रमाचा उपयोग होईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा यांनी केले.

सहकार व पणन विभाग, मॅग्नेट, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, कृषी विभाग, आत्मा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंबा उत्तम कृषी पद्धती’ बाबत प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्‍घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. इंद्र मणी बोलत होते.

Dr. Indra Mani
Fruit Crop Insurance : फळपीकविम्यासाठी किमान क्षेत्राची अट रद्द करा

या कार्यक्रमासाठी विस्तार कृषी विद्यावेत्ता डॉ. सूर्यकांत पवार, विभागीय कृषी सहसंचालक डॉ तुकाराम मोटे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, फळबाग संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. जी. एम. वाघमारे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. किशोर झाडे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय परभणीचे माजी प्राचार्य डॉ. कादरी, फळबाग तज्ज्ञ डॉक्टर भगवानराव कापसे, फळ संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. गिरिधारी वाघमारे, मॅग्नेटचे विभागीय प्रकल्प संचालक गजानन वाघ, बदनापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. सचिन सोमवंशी, हेमंत जगताप, संदीप क्षीरसागर, अरुण नादरे, प्रगतिशील शेतकरी दिनेश गुगळे, कौतिक जंगले, मारुती पवार आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Dr. Indra Mani
Fruit Crop Farming : मोसंबी, संत्रा, केसर फळपिकांसह रोपवाटिकेतून मिळाली भक्कम साथ

कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा म्हणाले, की महाराष्ट्र हे फळबागांचे राज्य म्हणून देशात ओळखले जाते. परंतु अजूनही अनेक शेतकरी हे फळशेतीपासून दूर आहे. इतर पिकापासून कुटुंबाचा उदरनिर्वाह होऊ शकतो. पण आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी फळ बागेची गरज आहे. शेतकऱ्यांसमोर विविध अडचणी आहेत. त्यामुळे सर्व शास्त्रज्ञ व कृषी विभाग यांनी शेतकरी देवो भवः या भावनेने कार्य करण्याचा संकल्प करून काम केले तर अडचणी सोडविण्यात मदत होईल.

डॉ. मोटे म्हणाले, की आंबा लागवड व निर्यातीस खूप मोठा वाव आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्धतीचा अभ्यास व अवलंब करावा. मॅग्नेट प्रकल्पांतर्गत शासनाद्वारे विविध उपक्रम आंबा लागवड व निर्यातीसाठी घेण्यात येत आहेत. या प्रकल्पाद्वारे शासन शेतकऱ्यांसोबत आहे. श्री. वाघ यांनी मॅग्नेट प्रकल्प संदर्भात सविस्तर माहिती देत या प्रकल्पाचा शेतकऱ्यांनी फायदा करून घेण्याचे आवाहन केले. या उद्‍घाटन कार्यक्रमाचे संचालन डॉ. पिसुरे यांनी, तर आभार प्रदर्शन डॉ. संजुला भावर यांनी केले. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी शेतकरी बांधव सहभागी झाले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com