Biological Input : शेतकऱ्यांनी जाणले जैविक निविष्ठांचे तंत्र

Agriculture Laboratory Activities : वाशीम जिल्ह्यातील पथदर्शी बांधावरील प्रयोगशाळा उपक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
Laboratory activities
Laboratory activitiesAgrowon
Published on: 
Updated on: 

Bhandara News : कृषी विभाग तसेच ‘आत्मा’च्या वतीने पाचदिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन रेल्वे ग्राउंडवर करण्यात आले होते. मंगळवारी (ता. ३०) महोत्सवाचा समारोप झाला. या महोत्सवात वाशीम जिल्ह्यातील पथदर्शी बांधावरील प्रयोगशाळा उपक्रमाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला.

जय किसान शेतकरी गटाच्या वतीने बांधावरील प्रयोगशाळेचे मॉडेल या ठिकाणी मांडण्यात आले. शेतकऱ्यांनी या नावीन्यपूर्ण संकल्पनेविषयी उत्सुकतेने जाणून घेतले. जैविक निविष्ठा, ग्रॅन्युअल्स खते, बायोझॅम जेल, स्लरी अशा विविध प्रकारची उत्पादने या ठिकाणी होती.

Laboratory activities
Weed Management : तलावांमधील करीबा तणाचे जैविक व्यवस्थापन

शेतकरी समूहाच्या वतीने ही उत्पादने थेट बांधावरील प्रयोगशाळेत तयार केली जातात. याचा वापर केल्याने उत्पादन खर्चातही बचत होते. परिणामी, याचा वापरही शिवारात वाढला आहे.

Laboratory activities
Budget Session 2024 : 'केंद्र सरकारमुळे शेतकऱ्यांची स्थिती मजबूत; वीज आणि रस्तेही पोहोचले' : राष्ट्रपती मुर्मू

‘‘डॉ. संतोष चव्हाण, चंद्रपूरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांच्या मार्गदर्शनाखाली याची सुरुवात वाशीम जिल्ह्यात झाली. त्यानंतर या संकल्पनेची अंमलबजावणी राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये होत आहे,’’ असे जयकिसान शेतकरी समूहाचे विजय घुगे, आकाश बोडखे यांनी सांगितले.

झूम मीटिंगद्वारे समस्यांवर चर्चा

‘बांधावरील प्रयोगशाळा’ या संकल्पनेला व्यापक स्वरूप मिळाले आहे. अशा स्थितीत या संकल्पनेवर नव्याने काम करण्यास इच्छुक असलेल्यांना माहिती व्हावी, याकरिता दर रविवारी झूम मीटिंग होते. दिल्ली येथे डिसेंबर २०२३ मध्ये झालेल्या राष्ट्रीय परिषदेत वाशीम जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी या संकल्पनेविषयी मांडणी केली होती. त्यांच्या या कामाबद्दल कौतुक झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या परिषदेला उपस्थिती होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com