Tea Crop Production : भारतात चहा पीक उत्पादनात घट, दर वाढण्याची शक्यता

West Bengal Tea Production : पश्चिम बंगालमध्ये सरासरीच्या तुलनेत ५० ते ८० टक्के तर आसाममध्ये सरासरीच्या तुलनेत केवळ १० ते ३० टक्के चहाच्या मळ्यांना बाधक पाऊस झाला आहे.
Tea Crop Production
Tea Crop Productionagrowon

Tea Production India : यंदाच्या हंगामात चहा उत्पादन घट होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. आसाम आणि पश्चिम बंगाल हे मुख्य चहाचे उत्पादक राज्य आहे, या राज्यात चहाच्या मळ्यांना साजेस हवामान नसल्याने यंदा फटका बसला आहे. यंदाच्या चहा उत्पादनात आसाममध्ये २० तर पश्चिम बंगालमध्ये ४० टक्के उत्पादन घट झाली आहे. त्याचा थेट परिणाम चहाच्या किमती तसेच निर्यातीवर होण्याची चिन्हे आहेत. यामुळे चहा पावडरचे दर वाढण्याची शक्यता आहे.

टी असोसिएशन ऑफ इंडिया (टीएआय) ने याबाबत माहिती दिली आहे. पश्चिम बंगालमध्ये सरासरीच्या तुलनेत ५० ते ८० टक्के तर आसाममध्ये सरासरीच्या तुलनेत केवळ १० ते ३० टक्के चहाच्या मळ्यांना बाधक पाऊस झाला आहे. अशातच वातावरणात उष्मा वाढल्याने चहा उत्पादनासाठी पोषक वातावरण तयार झाले नाही. या दोन्ही राज्यातील पिकांना याचा फटका बसल्यामुळे यंदा दोन्ही राज्यातील सरासरी उत्पादन ३० टक्के घटणार असल्याची माहिती टीएआयने दिली.

दिवसभर धोधो पाऊस असल्याने चहा पिकाला म्हणावा तसा सूर्य प्रकाश मिळत नसल्याने चहा पानांची पुरेशी वाढ झाली नाही. एप्रिल महिन्यामध्ये झालेली गारपीट व अतिवृष्टी यामुळेही चहा पिकावर विपरीत परिणाम झाला. यामुळे यंदा पश्चिम बंगाल राज्यात तब्बल ४० टक्क्यांनी उत्पादन घटलं आहे. तर आसाममध्ये २० टक्के उत्पादनावर परिणाम झाला.

चहा मंडळाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी-मार्च, 2024 या कालावधीत उत्तर भारत (आसाम आणि पश्चिम बंगाल) चहाचे उत्पादन २१ दशलक्ष किलोग्रॅमपेक्षा कमी होते, तर संपूर्ण भारतातील उत्पादन १३ दशलक्ष किलोपेक्षा कमी होते. यामुळे चहा पावडर दरात पुढच्या काही महिन्यात वाढ होण्याची चिन्हे आहेत.

Tea Crop Production
Tea Biscuits Side Effects : चहा बिस्किट खाताय, शरिरावर होतील अनेक धोकादायक परिणाम

भारतातील चहाचे उत्पादन मागील वर्षीच्या तुलनेत अंदाजे ६० दशलक्ष किलोग्रॅमने घटण्याची शक्यता आहे. २०२२ च्या तुलनेत २०२३ मध्येही चहाच्या उत्पादनात ६ दशलक्ष किलोग्रॅमची घट झाली होती. जानेवारी ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत देशात ८०७.५ दशलक्ष किलोग्रॅम, तर जानेवारी ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत देशातील उत्पादन ८०१.२३ दशलक्ष किलोग्रॅमची आकडेवारी समोर आली होती.

ब्रह्मपुत्रा खोऱ्यात आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पुरेशा पेक्षा कमी पाऊस असलेल्या कडाक्याच्या उष्णतेमुळे उत्पादनावर विपरित परिणाम झाला आहे. संपूर्ण एप्रिल महिन्यात बराक व्हॅली आसाममधील अनेक चहाच्या मळ्यात वादळ आणि गारांसह मुसळधार पावसाने या प्रदेशातील दुसऱ्या फ्लश टी आणि एकूण उत्पादन परिस्थितीबद्दल चिंतित झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com