Loksabha Election Result : आंध्र प्रदेशमध्ये ‘टीडीपी’ तर ओडिशामध्ये भाजपची सत्ता

Election 2024 : आंध्रप्रदेश आणि ओडिशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) एकहाती बहुमत मिळविले असून या पक्षास १७५ जागांपैकी १३३ जागांवर आघाडी मिळाली आहे.
Election Result
Election ResultAgrowon

New Delhi : आंध्रप्रदेश आणि ओडिशातील विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले असून आंध्र प्रदेशात तेलगू देसम पक्षाने (टीडीपी) एकहाती बहुमत मिळविले असून या पक्षास १७५ जागांपैकी १३३ जागांवर आघाडी मिळाली आहे. तर, १४७ जागा असलेल्या ओडिशात ८० जागांवर आघाडीत घेत भाजपने सत्ता हस्तगत केली आहे.

आंध्र प्रदेशात १७५ जागांपैकी टीडीपी १३४, जनसेना पक्ष (जेएसपी) २१, ‘वायएसआर’ काँग्रेस १२, तर भाजप ८ जागांवर आघाडीवर आहे. ओडिशात १४७ जागांपैकी भाजप ८१, बिजू जनता दल (बीजेडी) ४७, आयएनसी १५, आयएनडी ३, सीपीआय १ जागेवर आघाडीवर आहे.

Election Result
Loksabha Election 2024 Result : दुपारपर्यंतचा कल! देशात एनडीएच्या मनसुब्याला 'ब्रेक'; इंडियाचा कमबॅक?

ओडिशामध्ये विधानसभेसाठी १३ मे ते १ जून या कालावधीत लोकसभा आणि विधानसभेच्या दोन्ही निवडणुका एकाच वेळी चार टप्प्यांत पार पडल्या. मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी बिजू जनता दल (बीजेडी) या ठिकाणी २४ वर्षांहून अधिक काळ सत्तेत होता. ‘बीजेडी’ने सर्व १४७ जागा लढविल्या. भाजपदेखील १४७ जागा, तर भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी) ७ जागा लढवत आहे.

Election Result
Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा आज फैसला

आंध्र प्रदेशमध्ये १३ मे रोजी लोकसभा निवडणुकांसोबतच विधानसभा निवडणुका झाल्या. ‘वायएसआर’ काँग्रेस पक्षाने सर्व १७५ जागा स्वतंत्रपणे लढवल्या, तर ‘टीडीपी’ने १४४ जागांवर उमेदवार उभे केले. पवन कल्याण यांच्या नेतृत्वाखालील जनसेना पक्षाने (जेएसपी) २१ जागा लढवल्या, तर भाजपने १० जागा लढवल्या.

आंध्र प्रदेशातील प्रमुख दावेदारांमध्ये मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी (वायएसआरसीपी), टीडीपी प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू आणि ‘जेएसपी’चे पवन कल्याण यांचा समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com