Jalgaon Bypass Road : तरसोद ते पाळधी ‘बायपास’आठ वर्षे रखडलेलाच

Highway Project : पाळधी ते तरसोददरम्यान बायपासचे काम आठ वर्षे रखडलेलेच आहे. मार्च २०२४ अखेर हे काम पूर्ण करण्याची ‘डेडलाइन’ दिली होती.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth HighwayAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : पाळधी ते तरसोददरम्यान बायपासचे काम आठ वर्षे रखडलेलेच आहे. मार्च २०२४ अखेर हे काम पूर्ण करण्याची ‘डेडलाइन’ दिली होती. अनेकदा या कामास मुदतवाढ मिळाली, पण काम मार्गी लागत नसल्याची स्थिती आहे.

महामार्गाचे अधिकारी व कंत्राटदार यांनी मध्यंतरी हे काम मार्च २०२४ अखेर काम पूर्ण करू, असे सांगितले होते. परंतु काम झाले नाही. मुदतवाढ मागणे व चुकीची माहिती देणे, असा प्रकार यात सुरू असल्याचे दिसत आहे. जळगाव शहराची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी जळगाव ‘बायपास’चे मार्च २०२४ पर्यंत काम पूर्ण करण्यात यावे, अशा सूचना प्रशासनाने दिल्या होत्या.

मात्र याकडे महामार्गाचे अधिकारी, कंत्राटदार सोईस्करपणे दुर्लक्ष करतात, असा अनुभव वारंवार येत आहे. तरसोद ते चिखलीदरम्यान गिरणा नदीवरील पूल, आसोदानजीकच्या रेल्वे रुळावरील उड्डाण पूल, पाळधीनजीकच्या रेल्वे पुलाचे काम, जळगाव - विदगाव - यावल रस्त्यावर उड्डाण पुलाचे काम, तरसोद फाट्यानजीक उड्डाण पुलाचे काम अपूर्ण आहे.

Shaktipeeth Highway
Industrial National Highway : औद्योगिक राष्ट्रीय महामार्ग रद्द करणार : वळसे पाटील

तरीही पारोळानजीक या मार्गावर टोलची वसुली सुरू आहे. मंत्री, अधिकाऱ्यांनी संबंधित कंत्राटदार व महामार्गाच्या अधिकाऱ्यांना हे काम पूर्ण करण्याच्या सूचना अनेक वेळा दिल्या. मात्र अद्यापही काम अपूर्ण आहे. शहरातून गेलेला महामार्गावर (कालिका माता ते खोटेनगर) आकाशवाणी चौक, अजिंठा चौफुली, ट्रान्स्पोर्टनगर येथे उड्डाण पुलाची गरज होती. अद्याप तो तयार झालेला नाही. तरसोद ते पाळधी ‘बायपास’ कामात भराव कामासाठी मध्यंतरी कार्यवाही झाली. काही भागांत कामही झाले. पण ते अपूर्णच आहे. पुलांचे मोठे काम त्यावर झालेले नाही. तरसोद फाट्याजवळील पूर्णतः बंद आहे.

Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’चा पुन्हा 'घाट'? ५ पट दर देण्याबाबत राजू शेट्टींना रस्ते विकास महामंडळाकडून पत्र

अठरा किलोमीटरचा ‘बायपास’

तरसोद ते पाळधी हा अठरा किलोमीटरचा ‘बायपास’ आहे. राष्ट्रीय महामार्ग ‘बायपास’च्या मार्गावर अनेक लहान-मोठी गावे आहेत. त्यात तरसोद, असोदा, भोकणी, आव्हाणे, मुमुराबाद, शिवार, जळगाव शिवार, पाळधी शिवार आदींचा समावेश आहे. ‘बायपास’ विविध भागांत उड्डाण पूल तयार करण्यात येत आहेत.

गिरणा नदीवरील तीनशे मीटरच्या पुलाच्या कामाची गती संथ आहे. ‘बायपास’चा रस्ता अनेक भागांत अद्याप कच्चा आहे. डांबरीकरण केव्हा होणार, असा प्रश्‍न आहे. कंत्राटदाराने मजुरांची संख्या वाढविली अन् रात्र-दिवस काम केल्यास काम एक वर्षात पूर्ण होईल. अन्यथा, आणखी मुदतवाढ व काम रखडल्याचा प्रकार होईल, अशी स्थिती आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com