Ahilyanagar News : शेतकऱ्यांना खरिपात पीककर्ज वाटपाबाबत सक्त आदेश देऊनही शेतकऱ्यांना कर्ज देण्यात राष्ट्रीयीकृत व खासगी बॅंकांचा कानाडोळा असल्याचे खरिपात दिसून आले आहे. आता रब्बी हंगामात २ लाख १७ हजार ५१९ शेतकऱ्यांना २ हजार चारशे ४५ कोटी १४ लाख रुपये पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. खरिपात पीककर्ज कमी वाटप करणाऱ्या बॅंकांनी रब्बीत उद्दिष्ट पूर्ण करावे, या बाबत आदेश दिल्याचे अग्रणी बॅंकेकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यात यावर्षी खरिपात ४ लाख ४४ हजार ५७२ शेतकऱ्यांना ५ हजार ४५७ कोटी ८ लाखांचे कर्ज देण्याचे उद्दिष्ट दिले होते. यंदा खरिपासाठी राष्ट्रीयीकृत १२ बॅंकांनी २३७२ कोटी रुपयांपैकी ७७३ कोटी ४० लाखांचेच वाटप केले आहे. त्यात स्टेट बॅंक ऑफ इंडिया, कॅनरा बॅंक, पंजाब आणि सिंध बॅंक, इको बॅंक यांनी अल्प कर्ज वाटप केले. खासगी १२ बॅंकांनी ६४४ कोटी ३४ लाख रुपये वाटप करणे अपेक्षित होते. या बॅंकांनी २२५ कोटी ६५ लाख रुपये म्हणजे ३५.०२ टक्के कर्जवाटप केले आहे.
जिल्ह्यात रब्बीत यंदा २ लाख १७ हजार ५१९ शेतकऱ्यांना २ हजार चारशे ४५ कोटी १४ लाख रुपये वाटपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांना ९७ हजार ९ ८६ शेतकऱ्यांनी १२७७ कोटी ७१ लाख, खासगी बॅंकांकडून ७७ हजार १०६ शेतकऱ्यांना ३४६ कोटी ९९ लाख पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे.
बॅंकनिहाय कर्जवाटपाचे उद्दिष्ट (कंसात शेतकरी संख्या)
बॅंक ऑफ बडोदा : १३८ कोटी २३ लाख (१२२८५), बॅंक ऑफ इंडिया : ४३ कोटी १४ लाख (४८७६) बॅंक ऑफ महाराष्ट्र : २११ कोटी ०७ लाख (१६,२८१), कॅनरा बॅंक : ९६ कोटी ८ लाख (५२१६), सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया : १७४ कोटी २० लाख (११,०२०), इंडिया बॅंक : २३ कोटी ४१ लाख (६७६), इंडिया ओव्हरसेस बॅंक : ४५ कोटी २३ लाख (१४७९), पंजाब आणि सिंध बॅंक : ३५ कोटी ५८ लाख (२०८९), स्टेट बॅंक ऑफ इंडिया : ३४७ कोटी २१ लाख (३२३४७), युको बॅंक : १२ कोटी ४४ लाख (४४२), युनियन बॅंक ऑफ इंडिया : १४६ कोटी ३९ लाख (११,१९५),
अॅक्सिस बॅंक : ६६ कोटी १६ लाख (७४५६), सीएसबी बॅंक : ३ कोटी १५ लाख (२७४), डीसीबी बॅंक : ४ कोटी ७२ (१७ कोटी ३७ लाख), फेडरल बॅंक : ९ कोटी ८६ लाख (६०१), एचडीएफसी बॅंक : ७२ कोटी ५६ लाख (३५,०५९), आयसीआयसी बॅंक : ६१ कोटी १७ (१३,७९९), आयडीबीआय बॅंक : ५९ कोटी २६ लाख (४६२४), आयडीएफसी बॅंक : १७ कोटी ६४ लाख (२७०४), इंडस बॅंक : २ कोटी ८४ लाख (३३४९), कोटक महिंद्रा बॅंक : २५ कोटी ८६ लाख (५१२८), आरबीएल बॅंक : ६ कोटी १० लाख (२२१), एस बॅंक : १७ कोटी ६७ (२२५४), जिल्हा सहकारी बॅंक : ८०२ कोटी ९ लाख (४०,९८८), महाराष्ट्र ग्रामीण बॅंक : १८ कोटी ३५ लाख (१४३९).
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.