Bamboo Cultivation : राज्यात १० हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे लक्ष्य

Eknath Shinde : अलीकडच्या काळात बांबूपासून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत असल्याने नगदी पीक म्हणून उदयाला येत आहे.
Bamboo Cultivation
Bamboo CultivationAgrowon
Published on
Updated on

Mumbai News : अलीकडच्या काळात बांबूपासून शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळत असल्याने नगदी पीक म्हणून उदयाला येत आहे. कोकणासह राज्यातील अन्य भागांत हाताला काम देणारा बांबू पर्यावरण रक्षणासाठीही महत्त्वाचा आहे. त्यामुळे येत्या काळात १० हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे राज्याचे लक्ष्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी (ता. ९) केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे पर्यावरणीय शाश्वतता शिखर परिषदेच्या उद्‌घाटन प्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. या वेळी कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पाटील, गोदरेज उद्योग समूहाचे नादिर गोदरेज, पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव सचिव अनुप कुमार, वन विभागाचे सचिव वेणुगोपाल रेड्डी यांच्यासह विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Bamboo Cultivation
Bamboo Cultivation : बांबू लागवडीसाठी मुख्यमंत्र्यांचे तब्बल ११ तास

दरम्यान दुपारच्या सत्रात राज्यपाल रमेश बैस यांनी संवाद साधला. या वेळी त्यांनी पर्यावरण बदलासह बदलत्या शेती पद्धतीचा आढावा घेतला. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘‘वातावरणीय बदलामुळे निसर्गचक्र बदलत असून अवकाळी, गारपीट, अतिवृष्टी अशा समस्यांचा सामना करावा लागत आहे.

पर्यावरण संवर्धन करण्यासाठी कार्बनचे उत्सर्जन कमी करणे गरजेचे असून त्याचाच भाग म्हणून बांबू लागवड उपक्रम हाती घेण्यात आला आहे. बांबूमध्ये पर्यावरण समतोल राखण्याची प्रचंड क्षमता आहे.

एक बांबू ३२० किलो प्राणवायू निर्माण करतो. इतर वृक्षांच्या तुलनेत ३० टक्के जास्त कार्बन बांबू शोषतो. बांबू लागवडीतून शेतकऱ्यांनाही फायदा होतो. त्यांचा आर्थिकस्तर उंचावण्यासाठी मदत होते. उसापेक्षा बाबू लागवड जास्त फायदेशीर आहे.’’

अध्यक्ष पटेल म्हणाले, की मुख्यमंत्री शिंदे यांच्यामुळे आज महाराष्ट्रात बांबूला राजाश्रय मिळाला आहे. त्यांच्या प्रयत्नातून राज्यात मोठ्या प्रमाणावर बांबूची लागवड होत आहे. या शिखर परिषदेस जगभरातील संशोधक आले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाचा उपस्थित शेतकऱ्यांना फायदा होईल. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली देशपांडे यांनी केले.

Bamboo Cultivation
Bamboo Cultivation : गट शेतीच्या माध्यमातून बांबू लागवड करा

उद्योग क्षेत्राने पुढे आले पाहिजे

वातावरणीय बदलाशी झुंजणारा शेतकरी अनेक प्रयोग करून शेती पिकवत आहे. अशा काळात उद्योग क्षेत्राने पुढे आले पाहिजे. बांबू शेती फायदेशीर आहे असे सांगितले जात आहे. पण त्याला बाजारपेठ मिळवून देण्यात उद्योग क्षेत्राचा मोठा भार उचलावा लागेल, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले. हवा प्रदूषण, जमिनीची धूप रोखणारा बांबू पर्यावरण रक्षणात मोठी भूमिका बजावतो, असेही ते म्हणाले.

लाखो झाडे गेली कुठे?

राज्यपाल बैस यांनी दरवर्षी होणाऱ्या सरकारी वृक्षारोपण कार्यक्रमावर टीका करत अधिकाऱ्यांचे कान टोचले. ते म्हणाले, दरवर्षी लाखो झाडे लावण्याची मोहीम होती घेतली जाते. खड्डे काढले जातात. झाडे लावल्याचे फोटो येतात. पण पुन्हा पुढील वर्षी तेथे कसे काय वृक्षारोपण होऊ शकते? मागील वर्षी जर झाडे लावली असतील तर आता पुन्हा तेथे झाडे कशी काय लावली जातात हा संशोधनाचा विषय आहे, असेही म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com