Agriculture Water Crisis : मंगळवेढ्यात फळबागांना टँकरने पाणी

Watering Orchard with Tankers : उन्हाळा सुरूही झाला नसताना फळबागायतदार शेतकऱ्यांना बहरात असलेल्या द्राक्ष, डाळिंब व आंब्याच्या फळबागांना टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे.
Agriculture Irrigation
Agriculture IrrigationAgrowon
Published on
Updated on

Solapur News : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात येणाऱ्या, कायम दुष्काळी असलेल्या मंगळवेढ्यातील १९ गावांत शेतीच्या पाण्याचा प्रश्‍न गंभीर बनला आहे. अजून उन्हाळा सुरूही झाला नसताना फळबागायतदार शेतकऱ्यांना बहरात असलेल्या द्राक्ष, डाळिंब व आंब्याच्या फळबागांना टँकरने विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. हिवाळ्यात ही परिस्थिती आहे तर उन्हाळ्यात खूपच भयानक परिस्थिती उद्‌भवेल असे शेतकऱ्यांचे मत आहे.

एका टॅंकरला तीन हजार रुपये

२४ हजार लिटर पाणीसाठा असलेल्या एका टॅंकरला कमीत कमी तीन हजार रुपये मोजावे लागत आहेत. अंतर वाढले तर साडेतीन हजार ते चार हजार रुपयांपर्यंत खर्च येत आहे. निसर्गाच्या व प्रशासनाच्या अवकृपेच्या कात्रीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही.

Agriculture Irrigation
Fruit Orchard : दुष्काळामुळे राज्याच्या फळबाग लागवडीत घट

त्यामुळे शेतकऱ्यांना विकतचे पाणी घेऊन बागा जगवण्याशिवाय पर्याय नाही. द्राक्ष व डाळिंब बागांचे बहार संपण्यास अजून दोन महिन्यांचा कालावधी आहे. तोपर्यंत लाखो रुपयांचा भुर्दंड शेतकऱ्यांना बसणार आहे.

Agriculture Irrigation
Fruit Orchard : फलोत्पादन विकास अभियानातून फळबागांची संधी

म्हैसाळ योजना असून अडचण...

म्हैसाळ योजनेच्या सहाव्या टप्प्यातील शेवटच्या लाभक्षेत्रात मंगळवेढ्यातील १९ गावे टेलला येत असल्याने हेडवर असलेल्या गावांची तहान भागल्यावरच या गावांना पाणी मिळते. शिवाय गेल्या तीन वर्षांपासून अजूनही या योजनेतील लाभक्षेत्रामधील गावांमध्ये पाणीपुरवठ्याची कामे अपूर्णच आहेत. ही कामे अशाच गतीने सुरू राहिल्यास अजून दोन- तीन वर्षे जातील, असे जाणकारांचे मत आहे.

माझी डाळिंबाची ६०० झाडे आहेत. ओढ्याकडेला शेत आहे. तरीही डाळिंब बागेला द्यायला पाणी नाही. त्यामुळे गेल्या महिनाभरापासून टँकरने विकतचे पाणी घेत आहे.
अप्पासाहेब बिराजदार, शेतकरी, सलगर खुर्द

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com