Raigad Tourism: माणगाव तालुक्यातील ताम्हिणी घाट परिसरातील देवकुंड, खजिना व अंधारबन ट्रेक, धबधबे आणि समृद्ध निसर्गामुळे दरवर्षी पावसाळ्यात देशभरातील पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. मात्र, यंदा जूनचा पंधरवडा उलटूनही रायगड जिल्ह्यात दमदार पावसाचे आगमन न झाल्याने येथील पावसाळी पर्यटनावर परिणाम झाला आहे. .पावसाअभावी सह्याद्रीच्या डोंगररांगांवरील धबधबे कोरडे असून, धुक्याची चादर आणि हिरवाईचे मनमोहक दृश्य अद्याप दिसत नाही. त्यामुळे देवकुंड, खजिना आणि अंधारबन परिसरात पर्यटकांची वर्दळ कमी झाली आहे..Monsoon Delay Issue: पावसाच्या विलंबामुळे सिंचनाच्या गरजेत वाढ; शेतकरी चिंतेत.भिरा, पाटणूस, विळे आणि रवाळजे परिसरातील नैसर्गिक सौंदर्यही पावसाच्या प्रतीक्षेत आहे. कुंडलिका नदीचे उगमस्थान असलेले देवकुंड आणि दुर्मिळ गिधाडांसाठी प्रसिद्ध असलेला खजिना ट्रेकही.Monsoon 2026 : मॉन्सून पुढच्या आठवड्यात वेग घेणार; एल निनोमुळे कमी पावसाची शक्यता?.सध्या ओस पडला आहे. पाऊस लवकर सुरू झाल्यासच या परिसरातील पर्यटनाला पुन्हा गती मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक व्यावसायिक आणि निसर्गप्रेमींनी व्यक्त केली आहे..पावसाळ्यात येथे लाखो पर्यटक येत असल्याने स्थानिक हॉटेल व लॉज व्यावसायिक, छोटे दुकानदार, गाईड, विक्रेते, यांना मोठा रोजगार मिळतो. विशेष म्हणजे आदिवासी बंधू भगिनींना चांगला रोजगार मिळतो. सर्व लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या धंद्यावर प्रतिकूल परिणाम झाला असून, त्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.