ॲग्रोवन वृत्तसेवा
Talathi waiting list : मुंबई : राज्यातील वादग्रस्त तलाठी भरतीचा निकाल बुधवारी (ता. २४) पहाटे जाहीर करण्यात आला असून, २३ जिल्ह्यांतील निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. तसेच या जिल्ह्यांतील प्रतीक्षा यादीही तयार करण्यात आली आहे.
पेसा (अनुसूचित क्षेत्र) कायदा लागू असलेल्या १७ संवर्गातील सरळसेवा पदभरतीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याने पेसा क्षेत्र नसलेल्या जिल्ह्यातील निवड यादी जाहीर करण्यात आली.
दरम्यान, तलाठी भरतीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप विरोधकांसह भरतीप्रक्रियेतील उमेदवारांकडून करण्यात आला होता. या परीक्षेचा निकाल जाहीर केल्यानंतर काही उमेदवारांना अतिरिक्त गुण मिळाल्याने ही परीक्षा वादात सापडली होती.
तलाठी परीक्षा रद्द करून एसआयटी चौकशी व्हावी ही राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थींची मागणी असताना सरकारने त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी निकाल जाहीर जाहीर केल्यानंतर केला आहे.
महसूल व वनविभागाने गट क संवर्गातील निवड व प्रतीक्षा यादी बुधवारी पहाटे जाहीर केली. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, बुलडाणा, वाशीम, परभणी, बीड, लातूर, जालना, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, धाराशीव आणि हिंगोली या जिल्ह्यांचा समावेश आहे.
पेसा कायदा लागू असलेल्या १३ जिल्ह्यांची निवड यादी तयार करण्याचे काम संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हा निवड समित्यांमार्फत सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानंतर सुरू करण्यात येणार आहे. ज्या २३ जिल्ह्यांतील निवड यादी जाहीर झाली आहे. तेथील पात्र उमेदवारांची ओळख, प्रमाणपत्रे व संबंधित कागदपत्रे पडताळणी, वैद्यकीय तपासणी, चारित्र्य पडताळणी याचप्रमाणे समांतर आरक्षणाप्रमाणे कागदपत्रांची पडताळणी ही अंतिम नियुक्तीपूर्वीची कार्यवाही जिल्हा निवड समितीमार्फत करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय कार्यवाहीबाबतचे वेळापत्रक संबंधित जिल्ह्याच्या शासकीय संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते असे मुख्यमंत्री आणि सत्ताधारी सांगत असतात. मात्र लोकशाहीचा हवा तसा अर्थ काय केवळ सत्ता भोगण्यासाठी काढला जातो का? जनतेतून एखादी मागणी होत असताना त्याकडे दुर्लक्ष करणे ही लोकशाही आहे का?
तलाठी परीक्षा रद्द करून एसआयटी चौकशी व्हावी ही राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षार्थींची मागणी असताना सरकारने त्यांच्या मागणीला केराची टोपली दाखवली आहे.
- विजय वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, विधानसभा
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.