Chandrkant Patil : वनराई नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करा

Forest Department : कोथरूडमधील टेकड्यांवर वनराईला आग लावून नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले.
Nainital Forest Fire
Nainital Forest FireAgrowon
Published on
Updated on

Pune News : कोथरूडमधील टेकड्यांवर वनराईला आग लावून नष्ट करणाऱ्या टवाळखोरांवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिले. कोथरूडमधील म्हातोबा टेकडीवर शनिवारी (ता. ४) आग लागून अनेक झाडे नष्ट झाली. याची गंभीर दखल घेत आमदार पाटील यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

पुणेकर आणि पुण्यातील टेकड्या यांचे नाते खूप जवळचे आहे. शहरातील टेकड्या या शहराची फुफ्फुसे असल्याने टेकड्या संवर्धनासाठी आमदार चंद्रकांत पाटील सातत्याने प्रयत्नशील असतात. हरित कोथरूडसाठी ६५ व्या वाढदिवसानिमित्त वृक्ष लागवडीचा संकल्प करून, महात्मा, म्हातोबा, पाषाण आदी भागांतील टेकड्यांवर वृक्ष लागवड केली.

त्यापैकी म्हातोबा टेकडीवर ६५०० औषधी वनस्पतींसह पर्यावरण संवर्धनात अतिशय महत्त्वाचे ठरणारे वृक्ष लावले असून, त्याच्या संवर्धनासाठी विशेष व्यवस्था देखील केली आहे. यामध्ये टेकडीवरील झाडांना पाण्याचे पाइप, टाक्या, खते, वृक्ष संवर्धनासाठी आवश्यक बाबी वैयक्तिक व्यवस्थेतून करण्यात आल्या आहेत.

Nainital Forest Fire
Forest Fire : सातपुड्यात वणवे पेटविण्याबाबत हवा कटाक्ष

तसेच, याच्या देखरेखीसाठी सात माणसांची नेमणूक केली आहे. मात्र, काही टवाळखोर या पर्यावरण संवर्धनाच्या कामात खोडा घालण्याचे काम करत असून; म्हातोबा टेकडीवर शनिवारी तिसऱ्यांदा आगीची घटना घडल्याने येथील वनराईला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे याची गंभीर दखल घेऊन वनविभागाच्या अधिकाऱ्यांना कठोर कारवाईचे निर्देश दिले.

Nainital Forest Fire
Forest Fire Prevention : जंगलांना वनव्यापासून वाचवण्यासाठी जाळरेषा रचण्यास सुरुवात

चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘टेकडी हा पुण्याचा श्वास आहे. टेकड्यांवर चांगले वातावरण असल्याने नियमित व्यायाम करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक येतात. मात्र, कोथरूडमधील टेकड्यांवर काही टवाळखोर वनसंपदेचे नुकसान करत आहेत. त्यामुळे वन विभागाने याची गंभीर दखल घेऊन; कठोर कारवाई करावी.

’’ दरम्यान, या घटनेचे गांभीर्य ओळखून सोमवारी (ता. ६) सकाळी ७ वा. म्हातोबा टेकडीची आमदार चंद्रकांत पाटील पाहणी करणार आहेत. तसेच, अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी वन विभागाचे अधिकारी, पोलिस प्रशासन यांच्यासमवेत आढावा घेणार आहेत. तसेच, वृक्ष संवर्धनासाठी पर्यावरण प्रेमींशी संवाद साधणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com