
Pune News : पुरंदर तालुक्यात दरवर्षी अनेक ठिकाणी वणवे लागतात. त्यामुळे मोठे नुकसान होते. ते होऊ नये, यासाठी वणवे नियंत्रणासाठी आडाचीवाडी येथील डोंगर परिसरामध्ये वनविभागाच्या वतीने जाळरेषा तयार करण्यासाठी पाऊले उचलली आहेत, अशी माहिती वन विभागाच्या सूत्रांनी दिली.
दरवर्षी सर्वच डोंगर परिसरात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर गवत, झाडे झुडपे, वेगवेगळ्या वनस्पती उगवतात. पावसाळा संपल्यानंतर साधारणतः नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांच्या दरम्यान हे उगवलेले गवत व इतर वनस्पती वाळू लागतात. यादरम्यान डोंगर, जंगलातील मोठ्या झाडांचा वाळलेला पाला जमिनीवर पडलेला असतो.
हेच वाळलेले गवत व इतर वनस्पती तसेच पाला पाचोळ्याला अनेकदा वणवे लावण्याचे प्रकार काहींकडून घडवले जातात. अनेकदा गैरसमजूतीनेही वणवे लावले जातात. या वणव्यामध्ये अनेकदा संपूर्ण डोंगरच्या डोंगर, जंगले जळून खाक होऊन निसर्गाचा ऱ्हास मोठ्या प्रमाणावर होतो. यात वनसंपदा नष्ट होतात. अनेकदा पशू पक्षी, वन्यप्राणी होरपळून निघतात.
डोंगर परिसरामध्ये वनविभागाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली आहे. या रोपांचे रक्षण व्हावे, परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावलेल्या आगीचा वनविभागाच्या या रोपट्यांना परिणाम होऊ नये, यासाठी वनविभागाने नुकतेच जाळरेषा टाकण्यात आल्या आहेत.
सासवड वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे, आडाचीवाडी परिसरातील डोंगरांमध्ये जाळरेषेचे काम करण्यात आले. या मोहिमेमध्ये वाल्हे वनरक्षक पोपटराव कोळी, वनमजूर हनुमंत पवार, महादेव खोमणे, किरण पवार, लहू रणनवरे, प्रेम दाते आदी कर्मचारी सहभागी झाले होते.
वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास
वनविभागाच्या सीमेपासून आतील व बाहेरील रस्ता दुतर्फा अंतर ठेऊन जाळरेषेचे काम केल्याने डोंगर परिसरातील वनसंपदेचे जतन होण्यासाठी याचा फायदा होणार आहे. याशिवाय दुष्काळी परिस्थितीमुळे या भागात असलेल्या वन्यजीवांचीही पाण्याअभावी कासावीस होत आहे. परिसरात होत असलेली अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असून वन्यजीव व प्राण्यांचीही संख्या घटत चालली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.