Flood Kolhapur : कृष्णेचा महापूर रोखण्यासाठी उपाययोजना करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Krishna river : कृष्णा खोऱ्याचा भाग असलेल्या सर्व राज्यांची मिळून केंद्रीय प्रतिनिधित्व असलेली कृष्णा खोरे नदी संघटनेची लवकरात लवकर स्थापन करावी.
Flood Kolhapur
Flood Kolhapuragrowon

Kolhapur Flood : कर्नाटकातील आलमट्टी धरणामुळे कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात कृष्णा व पंचगंगा नदीला महापुराचे संकट जवळपास दरवर्षी कायमच ठरलेले आहे. त्यामुळे केंद्रीय जल आयोगाने नोव्हेंबर २०१८ मध्ये आलमट्टी धरणाच्या पाणी पातळीबाबत दिलेले निर्देश तंतोतंत पाळावेत, यावर महाराष्ट्र सरकारचे लक्ष असावे, याबरोबरच इतरही उपाययोजना कराव्यात, अशा मागण्यांचे निवेदन कृष्णा महापूर नियंत्रण नागरी कृती समिती (सांगली) च्या शिष्टमंडळाने आज जिल्हाधिकारी अमोल येडगे यांची भेट घेऊन निवेदन दिले.

समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी येडगे यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन देऊन चर्चा केली. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेतली जात असून प्रशासनाकडून तयारी सुरू असल्याचे सांगितले.

निवेदनातील मागण्या अशा, महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व धरणांनी केंद्रीय जलआयोगाच्या २०१८ ‘एकात्मिक धरण परिचालन आराखडा’ व ‘धरण व्यवस्थापन’ संबंधी मार्गदर्शक तत्त्‍वांचे तंतोतंत पालन करावे, तसेच पालन न करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.

रोहिणी नक्षत्र सुरू झाल्यानंतर २४ ते २८ मे दरम्यान हवामानाचा व पर्जन्यमानाचा अंदाज घेऊन कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांवरील बरगे व ब्यारेजेसची दारे तळातून खुली करणे गरजेचे आहे. त्याबाबतचे प्रमाणपत्र संबंधित कार्यकारी अधिकाऱ्यांनी सादर करावे.

Flood Kolhapur
Kolhapur Fruit Market : कोल्हापूर बाजारपेठेत करवंद, जांभळाचा दरवळ

महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील सरकार व प्रशासन यांचा पूर व्यवस्थापनाच्या दृष्टीने वर्षा ऋतु सुरू होण्यापूर्वी काही महिन्यांपासून समन्वय असावा. कृष्णा खोऱ्याचा भाग असलेल्या सर्व राज्यांची मिळून केंद्रीय प्रतिनिधित्व असलेली कृष्णा खोरे नदी संघटनेची लवकरात लवकर स्थापन करावी.

यामध्ये स्वयंसेवी संघटनांचा प्रामुख्याने समावेश असावा. तसेच यामध्ये मे महिन्यापासून ऑगस्टपर्यंत प्रत्येक महिन्यात दोन सक्तीच्या आंतरराज्यीय बैठकीचे नियोजन करावे. यावेळी प्रभाकर केंगार, सुयोग हावळ, संजय कोरे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com