MLA Randhir Savarkar News : बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करा : आमदार सावरकर

Bogus Seed : शेजारील राज्यातून खोटे बीटी बियाणे विक्रीसाठी येण्याची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने दक्ष राहावे. अशा बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करावी.
Bogus Seed
Bogus SeedAgrowon

Bogus Seed Akola News : शेजारील राज्यातून खोटे बीटी बियाणे विक्रीसाठी येण्याची शक्यता लक्षात घेता कृषी विभागाने दक्ष राहावे. अशा बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई करावी, असे निर्देश आमदार रणधीर सावरकर यांनी खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत दिले.

Bogus Seed
Bogus Fertilizer : बनावट कृषी निविष्ठाप्रकरणी गुन्हा दाखल करा

अकोला तालुकास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा सभा आमदार सावरकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.१५) पार पडली. यावेळी ते बोलत होते.

या सभेस पंचायत समिती सभापती सुलभा सोळंके, जिल्हा परिषद सदस्य शिवा मोहोड, पुष्पा इंगळे, शंकरराव इंगळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर किरवे, तालुका कृषी अधिकारी शशिकांत जांभुरुणकर, तसेच सर्व मंडळ अधिकारी, कृषिसेवक उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी तालुका कृषी अधिकारी जांभुरुणकर यांनी तालुका खरीप हंगाम पूर्व तयारी आढाव्याचे सादरीकरण केले. खरिपात ९२ हजार २८८ हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यात सोयाबीन ४० हजार ३५० हेक्टर, कपाशी ३० हजार हेक्टर, तूर ११३०८ हेक्टर, मूग एक हजार १५० हेक्टर, उडीद ७०० हेक्टरमध्ये लागवडीचे नियोजन आहे.

आमदार सावरकर यांनी निर्देश दिले, की ज्वारी उत्पादन क्षेत्र वाढवणे आवश्यक असून याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. याकामी कृषिसेवकांना लक्षांक निर्धारित करून द्या. असे निर्देश दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com