Bogus Fertilizer : बनावट कृषी निविष्ठाप्रकरणी गुन्हा दाखल करा

Fertilizer Selling : शेतकऱ्यांना योग्य दर्जाच्या कृषी निविष्ठा योग्य दरात व वेळेत प्राप्त होण्यासाठी राज्य सरकारने जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची स्थापना केली आहे.
Fertilizer
Fertilizer Agrowon

Fertilizer Nashik News : शेतकऱ्यांना योग्य दर्जाच्या कृषी निविष्ठा योग्य दरात व वेळेत प्राप्त होण्यासाठी राज्य सरकारने जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची स्थापना केली आहे.

त्यामुळे कलम अथवा नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास येतात निरीक्षक अथवा भरारी पथकाने न्यायालयात अथवा फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे परिपत्रक जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी काढले आहे.

शेतकऱ्यांची फसवणूक झाल्यास गुन्हा दाखल करावा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. त्यासंबंधीचे परित्रपक जारी करण्यात आले. खते, बियाणे, कीटकनाशक या कृषी निविष्ठा उपलब्ध होण्यासाठी जिल्हा व तालुका भरारी पथकातर्फे आणि गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांतर्फे वेळोवेळी कृषी निविष्ठा उत्पादकांसह विक्री कंपनी अथवा केंद्रांची तपासणी करायची आहे.

संशयास्पद कृषी निविष्ठांचे नमुने काढायचे आहेत. अप्रमाणित अथवा दुय्यम दर्जाच्या कृषी निविष्ठांची जप्ती करायची आहे.

Fertilizer
Krishi Seva Kendra : घर बसल्या खत-बियाणे विक्री दुकानाचा परवाना कसा मिळवायचा?

अनुदानित खतांचा शेती व्यतिरिक्त विनापरवाना औद्योगिक वापरास प्रतिबंध करायचा आहे. असे गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कायद्यांतर्गत न्यायालयीन अथवा फौजदारी गुन्हा दाखल करावा, असे परिपत्रकात नमूद केले आहे.

बियाणे कायदे आणि कलम-नियम-नियंत्रण आदेश, महाराष्ट्र कापूस बियाणे कायदा कलम, खत नियंत्रण आदेश, खत वाहतूक आदेश व कलम, कीटकनाशक कायदा व कलम-नियम-नियंत्रण आदेश, अत्यावश्‍यक वस्तू कायदा कलम आदी बाबी जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केल्या आहेत.

कर्तव्यात दिरंगाई, कसूर होणार नाही याची दक्षता घ्या

कलम तसेच नियमांचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास बियाणे, खते, कीटकनाशक निरीक्षकांनी किवा भरारी पथकाने गुन्ह्याचे गांभीर्यानुसार कायद्याअंतर्गत न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी तसेच शेतकऱ्यांची फसवणूक केल्याची बाब निदर्शनास आल्यास भादवि कलम २१नुसार लोकसेवक म्हणून तत्काळ विनाविलंब भादवि कलम ४२० अंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करावा.

शेतकरी बांधवाना उत्तम दर्जाच्या कृषी निविष्ठा रास्त दरात व वेळेत प्राप्त होण्याच्या दृष्टिने कृषी, महसूल व पोलीस विभागाने जागरुक राहून विनाविलंब कारवाई करणे अपेक्षित असून कुठेही कर्तव्यात दिरंगाई, कसूर होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे जिल्हाधिकारी गंगथरन डी. यांनी परिपत्रकाद्वारे कळविले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com