Raju Shetti : 'स्वाभिमानी'ची उद्या मोटारसायकल रॅली, दत्त आणि शरद कारखान्याच्या चेअरमन यांच्यावर टीकास्त्र

Raju Shetti : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकमेकाच्या विरोधात लढले ते लोक आता एकत्र येऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मातीत घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Raju Shetti
Raju Shettiagrowon
Published on
Updated on

Sugarcane Kolhapur News : जे लोक जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकमेकाच्या विरोधात लढले ते लोक आता एकत्र येऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मातीत घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्वत:च्या तुंबड्या भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीस लावणार असतील तर मी स्वस्थ बसणार नाही. शेतकऱ्यांचे नुकसान होणार असेल तर मी कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला.

राजू शेट्टी यांचा दत्त कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील आणि शरद सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यावर असल्याचे दिसून आले. याचबरोबर उद्या (ता. ०२) रोजी मोटार सायकल रॅली होणार आहे. या पार्श्वभूमिवर आज शिरोळ येथील निवासस्थानी प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली.

यावेळी राजू शेट्टी म्हणाले की, जिल्ह्यातील साखर कारखानदार एकत्र येऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्यास नकार देऊन चालू गळीत हंगामातील एफ.आर.पी जाहीर करून गळीत हंगाम सुरू करत आहेत हे आम्हाला मान्य नाही. पुढील वर्ष साखर उद्योगासाठी चांगला जाणार आहे.

साखरेला जवळपास ३६०० पासून ते ४२०० रूपये पर्यंत दर मिळणार आहेत. यामुळे यावर्षी एफ आर पी आम्हाला मान्य नसून ऊस परिषदेत जो दर ठरेल तो घेतल्याशिवाय आम्ही हंगाम सुरू देणार नाही. उद्या मोटारसायकल रॅली कार्यकर्त्यांनी शांततेने पूर्ण करून ज्या ठिकाणी उसतोडी सुरू आहेत त्या बंद कराव्यात.

Raju Shetti
Raju Shetti : राजू शेट्टींची पदयात्रा स्थगित, मराठा आरक्षणाच्या आंदोलनास पाठिंबा, मनोज जरांगेंची घेणार भेट

ज्याठिकाणी पोलीस बळाचा वापर केला जाईल तिथे गांधींच्या मार्गाचा अवलंब करावा. मात्र जर कारखानदारांनी दादागीरी केली तर जशास तसे उत्तर द्या वेळप्रसंगी कायदा हातात घेवून याठिकाणी गुन्हे दाखल झाल्यास वकीलांची फौज दाखल करू मात्र आपल्या घामाच्या दामासाठीची लढाई जिंकूनच शांत बसायचे आहे असे शेट्टी म्हणाले.

यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, वैभव कांबळे, राम शिंदे, शैलेश आडके, सचिन शिंदे, सागर शंभूशेटे, रामचंद्र फुलारे, राजगोंडा पाटील, अजित पाटील, राजाराम देसाई यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com