Sustainable Irrigation : फळ पिकांसाठी शाश्वत सिंचनाची सोय गरजेची

Fruit Crop : मेहनत करण्याची तयारी, व्यवस्थापनातील सातत्य, सिंचनाची शाश्वत सोय हाच यशस्वी बागायतदाराचा कानमंत्र असल्याचे प्रतिपादन महाकेसर आंबा बागायतदार संघाचे उपाध्यक्ष डॉ. भगवान कापसे यांनी केले.
Dr. Bhagwan Kapse
Dr. Bhagwan KapseAgrowon

Nagpur News : शेती आणि पैसा आहे. सोबतच केवळ अनुदान योजनांचा लाभ घ्यायचा म्हणून फळबाग लागवड केली तर अशा प्रकारची फळबाग लागवड यशस्वी होत नाही. मेहनत करण्याची तयारी, व्यवस्थापनातील सातत्य, सिंचनाची शाश्वत सोय हाच यशस्वी बागायतदाराचा कानमंत्र असल्याचे प्रतिपादन महाकेसर आंबा बागायतदार संघाचे उपाध्यक्ष डॉ. भगवान कापसे यांनी केले.

महाकेसर आंबा बागायतदार संघ, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त सहकार्याने सोमवारी (ता. ६) विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनच्या सभागृहात आयोजित केसर आंबा लागवड व व्यवस्थापन या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. महकेसर आंबा बागायतदार संघाचे अध्यक्ष सुशील बलदवा, कोषाध्यक्ष शिवाजी उगले, सुनील ढोले, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशनचे आर. बी. गोयंका, ओम जाजोडिया, लक्ष्मीकांत पडोळे अनुराग पुराणिक, महाऑरेंजचे मनोज जवंजाळ यांची या वेळी उपस्थित होती.

Dr. Bhagwan Kapse
Fruit Crop Insurance : ‘एमआरसॅक’मधील त्रुटींचा केळी विमाधारकांना फटका

डॉ. कापसे पुढे म्हणाले, की भारताच्या तुलनेत पाकिस्तानची आंबा निर्यात सातत्याने वाढती आहे. त्यांनी दर्जा देखील राखला आहे. त्यामुळेच पाकिस्तानने आंबा व्यापाऱ्यात आपले स्थान मजबूत केले आहे. भारतात देखील आंबा हे पीक शाश्वत करायचे असल्यास तंत्रशुद्ध व्यवस्थापनावर भर देण्याची गरज आहे. त्यासाठी महाकेसर आंबा बागायतदार संघ सातत्याने प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांपर्यंत अंबा बाग व्यवस्थापनाचे बारकावे पोहचावे याकरिता संघ पुढाकार घेत आहे. आंबा लागवड करताना कोणकोणत्या बाबींवर भर दिला पाहिजे याविषयी देखील त्यांनी माहिती दिली.

आंबा पिकासाठी अति कोरडे हवामान हानिकारक राहते. मध्यम काळी जमीन आणि ती देखील निचरा होणारी जमीन पोषक ठरते. चुनखड चोपण जमिनीत आंबा चांगला येत नाही. सात ते आठ टक्के चुनखडी नसावी. एक मीटर पर्यंत पावडर चुनखडी असणे देखील या पिकासाठी बाधक ठरते. सुरुवातीला आंबा लागवड ही १३ बाय १३ मीटर वर होत होती त्यामध्ये केवळ ६९ झाडे प्रति हेक्टरी राहत होती.

Dr. Bhagwan Kapse
Fruit Crop Insurance : ‘एमआरसॅक’मधील त्रुटींचा केळी विमाधारकांना फटका

त्यापुढील काळात हे अंतर दहा बाय दहा मीटर आणि झाडांची संख्या प्रती हेक्टरी १०० वर पोहोचली. आता मात्र पाच बाय पाच मीटरवर लागवड होत असून हेक्टरी झाडांची संख्या ४०० राहते. त्यामुळे सहाजिकच उत्पादन उत्पादकतेतही वाढ झाली आहे. जागतिकस्तरावर विविध आंबा उत्पादक देश त्या सोबतच त्यांचा हंगामणीय बाजारात येणारा आंबा याविषयी देखील भगवान कापसे यांनी या वेळी माहिती दिली.

विश्वेश ॲग्रोमेड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे अनुराग पुराणिक यांनी भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरद्वारे विकसित करण्यात आलेल्या गामा इरिडेशन प्रक्रियेविषयी माहिती दिली. या माध्यमातून फळांची टिकवण क्षमता दहा ते बारा दिवस असल्यास ती २५ दिवसांपर्यंत वाढविता येते. त्यासोबतच कीड रोगांचा प्रादुर्भाव ही रोखण्यास हे तंत्रज्ञान सहाय्यभूत ठरते. देशात अशा प्रकारची सेवा देणाऱ्या २० कंपन्या सध्या कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी फळबाग लागली संदर्भाने असलेल्या कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com