Crop Damage Survey : धुळ्यात वादळी पावसामुळे नुकसानीचे पंचनामे पूर्ण

शिंदखेडा तालुक्यात बेमोसमी पाऊस व वादळाचा फटका ९६ गावांना बसला आहे. मार्च ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, अवकाळी पाऊस झाला होता.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Dhule News : शिंदखेडा तालुक्यात बेमोसमी पाऊस व वादळाचा फटका ९६ गावांना बसला आहे. मार्च ते एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह गारपीट, अवकाळी पाऊस झाला होता. त्यामुळे रब्बी हंगामाचे (Rabi Season) सुमारे दोन हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र बाधित झाले असावे असा अंदाज आहे.

साडेतीन हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे समजते. पंचनामे झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, कांदा पिकालाही भाव नसल्याने शेतातच कांदा पडून असल्याची परिस्थिती आहे.

यंदा रब्बी हंगामातील पिके काढणीला आली असताना वेळोवेळी अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फटका पिकांना बसला. गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी, बाजरी आदी फळपिके बाधित झाली.

Crop Damage
Crop Damage : परभणी -हिंगोलीत आंबा, हळद उत्पादकांना फटका

३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश शासनाकडून दिले होते. त्यानुसार महसूल विभागाच्या यंत्रणेकडून बाधित क्षेत्राचे पंचनामे बहुतांश पूर्ण करण्यात आल्याचे संबंधित विभागाकडून सांगितले जाते.

तापी काठावरील क्षेत्र वगळता इतर भागात जेमतेम उपशावर पाण्यातून रब्बीची पिके वाढविली. महागडे बी-बियाणे आणि खते फवारणी केली. त्यासाठी उपलब्ध होईल तेथून भांडवल आणत शेती फुलविली. तयार झालेले उत्पन्न पावसामुळे डागी झाले.

परिणाम, भाव कमी मिळाला, तर पिके वाया गेली. सध्या कांदा काढणीस शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे; परंतु कवडीमोलाने मागणी केली जात आहे. भांडवल निघेल की नाही यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

सद्यःस्थितीत पंचनामे झालेली आकडेवारी

अवकाळी पावसाचा फटका बसलेली गावे - ९६

बाधित क्षेत्र - १,७३४ हेक्टर (अजून वाढू शकते.)

नुकसानग्रस्त शेतकरी- ३,२८०

नुकसान झालेली पिके - गहू, हरभरा, मका, रब्बी ज्वारी, बाजरी, फळपीक आदी.

Crop Damage
Crop Damage : परभणी -हिंगोलीत आंबा, हळद उत्पादकांना फटका
आपल्या तालुक्यात महिनाभरात तीन वेळा अवकाळीचा पाऊस झाला. त्या त्या वेळीच बाधित क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करून घेतले आहेत. वरिष्ठ पातळीवर पैशांची मागणी केली आहे.
नवनाथ साबळे, तालुका कृषी अधिकारी, शिंदखेडा (जि. धुळे)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com