Marathwada Crop Damage Survey : परभणी, हिंगोली, धाराशिवमधील पंचनामे पूर्ण

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात १ ते २० मार्च दरम्यान अवेळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील परभणी (Parbhani), हिंगोली (Hingoli), धाराशिव (Dharashiv) या तीन जिल्ह्यातील वादळी पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे आटोपले आहेत. दुसरीकडे जालन्यात पंचनाम्याला गती इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमीच असल्याचे चित्र आहे.

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात १ ते २० मार्च दरम्यान अवेळी पाऊस व गारपिटीमुळे मोठ्या प्रमाणात शेतीपिकांचे नुकसान झाले. आठही जिल्ह्यात प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार जवळपास ९८ हजार ९६१.५५ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले होते.

त्यामध्ये ४३ हजार ०९६.१ हेक्टर वरील जिरायती ४९ हजार २८९.६५ वरील बागायत तर ६ हजार ५७५.८९ हेक्‍टरवरील फळ पिकांचा समावेश आहे. झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याला सुरवात झाल्यानंतर २९ मार्च अखेरपर्यंत धाराशिव, परभणी व हिंगोली येथीलही नुकसानीचे पंचनामे पूर्णतः उरकले आहेत.

Crop Damage
Unseasonal Rain & Crop Damage : अवकाळीचा २०० हेक्टरवरील पिकांना फटका

दुसरीकडे इतर जिल्ह्यांपैकी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात ८८ टक्के, नांदेड ८२ टक्के, बीड ७६ टक्के, लातूर ८१ टक्के, तर जालना जिल्ह्यात सर्वात कमी ६२ टक्के पंचनामे उरकले होते.

प्रशासनातील कर्मचारी संघटनेच्या संपामुळे सुरवातीला शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पंचनाम्यात अडथळे आले होते. त्यानंतर दोन दिवसात पंचनामे पूर्ण करण्याचे कृषिमंत्र्यांचे निर्देश बोलण्यापुरतीच मर्यादित राहिल्याचे चित्र आहे.

अजूनही मराठवाड्यात झालेल्या एकूण नुकसानीच्या ८० टक्के पंचनामे झाले असून २० टक्के पंचनामे झाले नसल्याची स्थिती आहे.

पंचनामे झालेल्या क्षेत्रामध्ये ८० हजार ७३.७६ हेक्‍टरवरील जिरायती, बागायत व फळपिकांचा समावेश आहे. त्यामुळे पंचनामे होणार केव्हा, त्याची मदत शासन देणार केव्हा, आधीच्या सततच्या पावसाने झालेल्या नुकसानीच्या भरपाईचे काय असा प्रश्न शेतकरी वर्गातून उपस्थित केला जात आहे.

Crop Damage
Satara Crop Damage : साताऱ्यात वादळी पावसाने ३१३ हेक्टर क्षेत्र बाधित

जिल्हानिहाय नुकसानीचे क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा - शेतकरी - क्षेत्र

छ. संभाजीनगर- ४८९१० - १९२४७.३३

जालना - ११६३४ - १५०९४.१७

परभणी- ५९९९ - ३९६०.८१

हिंगोली - ६५२६- ३८३८.७२

नांदेड - ३३६२६- २४६१३

बीड - २९०५८- १९०९०

लातूर - २२१९० - ११७६८.५२

धाराशिव - २६५२- १३४९

जिल्हा निहाय पंचनामे झालेल क्षेत्र (हेक्टरमध्ये)

जिल्हा - शेतकरी- क्षेत्र

छ. संभाजीनगर- १६९७३.४२ - ३९६१८

जालना- ८७९८ - ९४२३.६२

परभणी - ५९९९ - ३९६०.८१

हिंगोली - ६५२६ - ३८३८.७२

नांदेड - ३४४२४ - २०३५४

बीड - २१२६६ - १४५२५

लातूर - १८२३३- ९६४९.१९

धाराशिव - २६५२- १३४९

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com