Satara Crop Damage : साताऱ्यात वादळी पावसाने ३१३ हेक्टर क्षेत्र बाधित

वादळी पावसाने केलेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Satara Crop Damage Update : मागील वर्षी झालेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झालेल्या नुकसानीपोटी मदतीची प्रतीक्षा असताना आता नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे.

या वादळी पावसाने तीन तालुक्यांतील १४९७ शेतकऱ्यांचे ३१३.८० हेक्टर क्षेत्रावरील ८५ लाख ७३ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीत द्राक्ष, स्ट्रॅाबेरी, आंबा, भाजीपाला पिकांच्या समावेश आहे.

जिल्ह्यात झालेल्या वादळी पावसाने केलेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यामध्ये जिल्ह्यातील वाई, महाबळेश्वर, माण तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.

या तीन तालुक्यातील रब्बी पिकासह स्ट्रॅाबेरी, द्राक्ष आंबा, भाजीपाला या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. वादळी वारे, जोरदार पाऊस तसेच काही ठिकाणी गारपीट झाली होती. या झालेल्या नुकसानीचे पंचनाम्याचे काम पूर्ण झाले आहे.

Crop Damage
Crop Damage : पुणे जिल्ह्यात झालेल्या पीक नुकसानीच्या तक्रारी कराव्यात : डॉ. गोऱ्हे

यामध्ये १४९७ शेतकऱ्यांचे ३१३.८० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये सर्वाधिक वाई तालुक्यातील ११९७ शेतकऱ्यांचे २१९.७० हेक्टर, महाबळेश्वर तालुक्यातील २४० शेतकऱ्यांचे ६४ व माण तालुक्यातील ६० शेतकऱ्यांचे ३०.१० हेक्टर क्षेत्राचा समावेश आहे.

केलेल्या पंचनाम्यानुसार मदतीची रक्कम ८५ लाख ७३ हजार रुपये होत आहे. हातातोंडाला आलेली पिके वाया गेल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

मागील वर्षी झालेल्या अतिवृष्टीतील ३३ हजार शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत असताना आता नव्याने १४९७ शेतकऱ्यांची भर पडली आहे. सततच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नियोजन चुकत असल्याने भांडवल अडचण तसेच कर्जाचा आकडाही फुगत आहे.

यामुळे मागील नुकसानीची व सध्या झालेल्या नुकसानीची भरपाई लवकरात लवकर खात्यावर जमा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com