Land Acquisition : ‘एमआयडीसी’ला जागा देण्यास नवापुरातील शेतकऱ्यांचा विरोध

यापूर्वी देखील तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे खासगी शेतजमिनी भूसंपादन करण्यास विरोध असल्याबाबत निवेदन देण्यात आलेले होते.
Land Acquisition
Land Acquisition Agrowon
Published on
Updated on

Land For MIDC नवापूर, जि. नंदुरबार : नवापूर तालुक्यातील नांदवण व कोठडे येथील महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकरिता (Navapur MIDC) (एमआयडीसी) अतिरिक्त वाढीव औद्योगिक क्षेत्रासाठी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी (Agriculture Land) देण्यास व भूसंपादनास (Land Acquisition) विरोध असल्याबाबतचे निवेदन प्रांताधिकारी मीनल करनवाळ यांना नवापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिले.

निवेदनात म्हटले, की तालुक्यातील नांदवण व कोठडे येथील शेतजमीन अतिरिक्त औद्योगिक (एमआयडीसी) वाढीव क्षेत्राकरिता देण्यासाठी विरोध आहे.

नांदवण व कोठडे येथील शेतकऱ्यांच्या खासगी शेतजमिनीचे क्षेत्र व गट क्रमांक महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)साठी भूसंपादित करण्याची प्रक्रिया आपल्या स्तरावरून सुरवात करण्यात आलेली आहे.

Land Acquisition
Land Acquisition Compensation : शेतकऱ्यांना तुटपुंजा मोबदला

शेतकरी आदिवासी असून, ते निसर्ग व पारंपरिक पिढ्यान् पिढ्या शेतीवर उदरनिर्वाह व उपजीविका करतात.

आमच्या खासगी मालकीच्या शेतजमिनीत वाढीव क्षेत्र औद्योगिक वसाहतीसाठी जमीन अधिग्रहण झाल्यास आमची शेतकरी कुटुंबे पूर्णतः उद्‍ध्वस्त होऊन उघड्यावर येण्याची स्थिती निर्माण होणार आहे.

त्यामुळे नांदवण व कोठडे शिवारांतील औद्योगिक वाढीव क्षेत्रासाठी जमीन अधिग्रहण करण्यास आमचा पूर्णत: विरोध आहे.

Land Acquisition
Land Acquisition : सेझ प्रकल्पग्रस्तांचा सात-बारा कोरा करा

यापूर्वी देखील तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे खासगी शेतजमिनी भूसंपादन करण्यास विरोध असल्याबाबत निवेदन देण्यात आलेले होते.

भूधारकांच्या शेतजमिनी औद्योगिक वाढीव क्षेत्रासाठी भूसंपादनास आमचा पूर्ण विरोध आहे. भविष्यातसुद्धा विरोध राहील.

आम्हा शेतकऱ्यांना आपल्या स्तरावरून न्याय मिळावा अन्यथा शेतकऱ्यांकडून सत्यशोधक शेतकरी सभा, आदिवासी शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या प्रकारे लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल.

निवेदन देताना सुनील गावित, बायसू गावित, मीराबाई गावित, सुरेश गावित, बकाराम गावित, भिल्या गावित, वासू कोकणी, हाताळ्या गावित, होडलीबाई गावित, दिलीप कोकणी यांच्यासह नवापूर तालुक्यातील असंख्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. या वेळी सत्यशोधक शेतकरी सभेचे आर. टी. गावित उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com