Surangi Conservation : कोकणातील शेतकऱ्यांनी घेतलाय सुरंगी संवर्धनाचा वसा

Mahesh Gaikwad

सह्याद्रीतील वृक्ष प्रजाती

सह्याद्रीच्या कडेकपारीत असंख्य वैशिष्ट्यपूर्ण आणि बहुपयोगी वृक्षांच्या प्रजाती आहेत. मात्र, अज्ञान आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे अनेत जंगली वृक्षांच्या प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत.

Surangi Conservation | Agrowon

सुरंगी संवर्धन

परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांनी आपल्या भागातील सुरंगी वृक्षाचे संवर्धनाचा वसा घेतला आहे. या सुरंगीच्या झाडांना त्यांनी जिवापाड जपले आहे.

Surangi Conservation | Agrowon

हापूस आंबा

हापूस आंब्यासाठी प्रसिध्द अशा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावे मात्र अजूनही सुरंगी वृक्षाचे संवर्धन करताना दिसत आहेत.

Surangi Conservation | Agrowon

सुरंगी वृक्ष

विशेष म्हणजे आंब्याच्या या पट्ट्यात सुरंगी वृक्षाला व्यावसायिकतेची जोड देत रोजगारनिर्मितीही साधली आहे.

Surangi Conservation | Agrowon

पश्चिम घाट

पश्‍चिम घाटात अनेक लक्षवेधी वृक्ष आहेत. सुरंगी हा त्यातीलच एक. तळकोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्‍या गावांत सुरंगीचे वृक्ष आढळतात.

Surangi Conservation | Agrowon

सुरंगीचा वापर

सुरंगीच्या फुलांचा वापर केवळ वेणी, गजरा बनविण्यापुरताच सर्वांना माहीत आहे. मात्र, सुरंगीच्या सुकवलेल्या कळ्या, फुलांची बाजारपेठेत व्याप्ती पसरली आहे.

Surangi Conservation | Agrowon

सुरंगी दुर्मिळ वृक्ष

सुरंगीचे झाड साधारण आंब्याच्या झाडासारखेच मोठे असते. ते सुमारे ७० वर्षे जगते.

Surangi Conservation | Agrowon