Parliament Winter Session 2023 Live : लोकसभेमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा उपस्थित केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा मांडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सातबारा कोरा करण्याची मागणी केली.
लोकसभेत शून्य प्रहरादरम्यान सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रात एकीकडे दुष्काळी परिस्थिती आहे. तर दुसरीकडे अवकाळी पाऊसाचा फटका बसला आहे. द्राक्ष, कांदा, केळी, गहू, धान, कापूस, सोयाबीन आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे दुधाला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई देण्याची गरज आहे.
यासाठी केंद्राने तातडीने महाराष्ट्रात पथके पाठवण्यात यावे. महाराष्ट्राला केंद्राने मदत करावी. तसेच शेतकऱ्यांना संकटातून बाहेर पडण्यासाठी कर्जमाफी करण्यात यावी. तसेच त्यांना नवीन कर्ज देखील देण्यात यावे, अशी मागणी सुळे यांनी केली.
शेतकरी निसर्गाच्या संकटांमुळे अडचणीत आहे. दुसरीकडे सरकार शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य दर देत नसून याबाबतच्या धोरणांत सातत्याने चढउतार होत आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला असल्याची टिका सुळे यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.