Crop Protection : पिकांचे संपूर्ण संरक्षण आणि पोषण करणारी सन अँड ओशन ची उत्पादने

Sun and Ocean : मराठवाड्यातील मंगरूळ (ता. तुळजापूर) या गावातील शेतकरी कुटुंबातील एक तरुण घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीचा सतत विचार करत राहतो. जबाबदारीचे हे भानच त्याला पदवीचे शिक्षण पूर्ण होताना नोकरी करायला भाग पाडते. इथेच त्या तरुणाच्या मनात एक बीज रुजते आणि या एका बीजातून एक वटवृक्ष फुलतो
Crop Protection
Crop ProtectionAgrowon

Plant Protection : मराठवाड्यातील मंगरूळ (ता. तुळजापूर) या गावातील शेतकरी कुटुंबातील एक तरुण घरच्या बेताच्या आर्थिक परिस्थितीचा सतत विचार करत राहतो. जबाबदारीचे हे भानच त्याला पदवीचे शिक्षण पूर्ण होताना नोकरी करायला भाग पाडते. इथेच त्या तरुणाच्या मनात एक बीज रुजते आणि या एका बीजातून एक वटवृक्ष फुलतो... एका थेंबातून एक सागर निर्माण होतो... एक असा सागर जो त्यांचा फक्त व्यवसाय नव्हे, तर त्यांच्या आयुष्याचं ध्येय बनून जातं. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे राजकुमार भानुदासराव धुरगुडे- पाटील.

साधारणपणे १९८७ मध्ये बी.ए.ची परीक्षा झाल्यावर लगेच राजकुमार भानुदासराव धुरगुडे यांनी नाशिक इथे एका कृषी निविष्ठा कंपनीच्या उत्पादनाची मार्केटिंगची नोकरी स्वीकारली. वर्षभरात ते पुणे जिल्ह्यातील नारायणगाव इथे नोकरीसाठी आले. दरम्यान, त्यांनी राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. भविष्य खुणावत होतं. कंपनीची रीतसर परवानगी घेऊन नोकरीसोबत त्यांनी स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि १९९५ मध्ये नोकरी सोडून ‘छत्रपती ॲग्रो केमिकल्स (इंडिया)’ या नावाने नारायणगाव येथे सूक्ष्म अन्नद्रव्ययुक्त खते निर्मितीचा कारखाना सुरू करून उद्योगक्षेत्रात उडी घेतली.

“कारखाना, उद्योग हे काही शेतकऱ्यांच्या मुलांचे क्षेत्र नव्हे,” असा गैरसमज प्रबळ असण्याच्या त्या काळात हे एक मोठे धाडस होते. पण राजकुमार यांचा निर्णय पक्का होता. जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा आणि धाडस, अभ्यासूवृत्ती आणि कायद्याचे सखोल ज्ञान असणाऱ्या राजकुमार यांचे आणखी एक धाडसी पाऊल म्हणजे नारायणगाव इथे पूर्ण फायद्यात चालू असलेला कारखाना स्वत:च्या मंगरूळ या गावी स्थलांतरित करणे ! याविषयी राजकुमार म्हणाले, “तेव्हा मराठवाड्याला मागास म्हणून हिणवले जात होते. याचे मुख्य कारण म्हणजे तेथे उद्योगधंदे नाहीत. परिणामी, आर्थिक उलाढाल कमी. माझ्या कारखान्याच्या माध्यमातून स्थानिक युवकांना रोजगार आणि प्रेरणा मिळावी, यासाठी १९९७ मध्ये मी कारखाना तिथे स्थलांतरित केला.” शेतकऱ्याचा मुलगा एक यशस्वी उद्योजक होऊ शकतो, याचे हे एक मूर्तिमंत उदाहरण होते आणि पंचक्रोशीतील युवकांसाठी एक आदर्श !

Crop Protection
Hailnet for Crop Protection : कापडासारख्या ‘नेट’ने केले डाळिंब बागेचे संरक्षण

‘सन अँड ओशन’चा प्रवास ः
‘सन अँड ओशन ॲग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड’च्या रूपाने एक मोठी भरारी २००२ मध्ये घेतली. या भव्य कारखान्याचे उद्‍घाटन त्या वेळचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या हस्ते झाले. हा कारखाना राजकुमार यांनी विकत घेतलेल्या गावाबाहेरच्या माळरानावर सुरू झाला. त्यानंतर २००५ मध्ये ‘सन अँड ओशन क्रॉप सायन्स इंडिया’ आणि २०१० मध्ये ‘सन अँड ओशन बायो केअर इंडिया’ असे आणखी दोन कारखाने सुरू झाले. ‘सन अँड ओशन’ची ही यशस्वी घोडदौड आजतागायत सुरूच आहे. आजमितीला जैविक, सेंद्रिय आणि रासायनिक अशा तिन्ही प्रकारांत एकूण १५० हून अधिक उत्पादने ‘सन अँड ओशन’च्या छताखाली निर्माण होऊन भारतातील विविध भागांत त्यांचे वितरण होते. यामध्ये कीटकनाशके, बुरशीनाशके, तणनाशके, खते, पीकवाढ संजीवक इत्यादींचा समावेश आहे. गुणवत्ता, नैतिकता, सामाजिक बांधिलकी, निर्णयक्षमता आणि धाडस या पंचसूत्रीचा अवलंब करीत ‘सन अँड ओशन’ने ग्राहकांच्या मनात विश्‍वास निर्माण केला आहे.

Crop Protection
Pomegranate Crop Protection : डाळिंब बागांना मिळणार गारपीट संरक्षण जाळ्या

समाजकार्यातही तत्पर ः
उद्योग क्षेत्रातील प्रवासात वडील स्वातंत्र्य सेनानी दिवंगत भानुदासराव धुरगुडे यांचे आशीर्वाद आणि प्रेरणा पाठीशी असल्याचे राजकुमार धुरगुडे कृतज्ञपूर्वक सांगतात. मातुःश्री श्रीमती विमलबाई धुरगुडे यांचा मायेचा हात डोक्यावर, पत्नी सौ. अलका, मुले सूरज आणि सागर आणि कन्या वसुंधरा यांची मोलाची साथ त्यांना सतत लाभली. आईवडिलांच्या संस्कारांमुळेच उद्योग आणि समाजकार्य यांची सांगड त्यांना घालता आली. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्यांच्या कारणाचा शोध घेण्याबरोबर मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीसोबत खते,

बियाणे इत्यादी साहित्यांचे मोफत वाटप केले. समाजाचे आणि आपल्या मातीचे आपण काही देणे लागतो, या भावनेतून असे विविध उपक्रम ते नेहमी राबवत असतात.
समाजासाठी अत्यंत उपयुक्त उपक्रम म्हणजे ग्रामीण भागातून पुण्यात नोकरी, व्यवसायासाठी येणाऱ्या तरुणांसाठी २००५ मध्ये सुरू केलेले स्वा. से. भानुदासराव जयवंतराव धुरगुडे ‘मार्गज्ञ’ वसतिगृह आणि तरुणींसाठी मातुःश्री विमलबाई भानुदासराव धुरगुडे ‘स्वावलंबी’ वसतिगृह. ग्रामीण भागात रोजगार मिळत नसल्यामुळे युवक मोठ्या शहरात येतात. पण इथे त्यांची राहण्याची सोय होत नाही. ही गरज ओळखून राजकुमार यांनी ही वसतिगृहे सुरू केली. रोजगार मिळेपर्यंत ३ ते ४ महिने इथे अत्यंत अल्प शुल्कात मुले-मुली राहू शकतात, अत्यंत गरिबांसाठी ही सेवा मोफत दिली जाते, असे राजकुमार यांनी सांगितले. आजवर सहा हजारांहून जास्त गरजूंनी याचा लाभ घेतला आहे.
वडिलांचा जयंती दिन १ जानेवारी निमित्त मागील चोवीस वर्षांपासून मराठवाडास्तरीय शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते. या माध्यमातून मराठवाड्याची भावी पिढी सक्षम बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचप्रमाणे राजकुमार हे विविध महाविद्यालयांत जाऊन ‘नोकरी-व्यापार- उद्योग’ हा त्रिसूत्री मंत्र सांगून शेतकऱ्यांच्या मुलांना ‘व्यावसायिक- उद्योजक बना’ असा संदेश देऊन त्यांना सर्वतोपरी मदत करत असतात. आजूबाजूच्या समाजासाठी सतत काहीतरी करणे, हा राजकुमार यांचा स्वभावधर्म आहे. शेतकऱ्यांसाठी व्यवसाय हिशोब वही - ‘कृषी अर्थमेळ’चे मोफत वाटप असू दे किंवा मागील १४ वर्षांपासून दरवर्षी पुण्यात १७ सप्टेंबरला ‘मराठवाडा मुक्तिदिना’निमित्त कार्यक्रमाचे भव्य आयोजन असू दे, राजकुमार यांचा उत्साह वाखाणण्याजोगा असतो.

उत्पादक आणि शासनामधील दुवा
‘सन अँड ओशन- पिकांचे संपूर्ण संरक्षण आणि पोषण’ हे कंपनीचे ब्रीदवाक्य आहे, याचे भान त्यांना पावलोपावली असते. ‘सेंद्रिय’च्या नावाने होणारा गैरवापर त्यांच्या वेळोवेळी लक्षात येत होता. त्यांच्या अध्यक्षतेखाली २०१० मध्ये Agro Inputs Manufacturers Association of India ची स्थापना झाली. या माध्यमातून उत्पादक आणि शासन यांच्यातला दुवा साधण्याचे काम ते करतात. या संदर्भात ते म्हणाले, “कायद्याच्या अभावामुळे काही कंपन्या सामान्य दर्जाचे उत्पादन बाजारात विकून शेतकऱ्यांची मोठी फसवणूक करत होते. आम्ही आमच्या संघटनेमार्फत याविरोधात कायदेशीर लढा दिला. याचे फलित म्हणजे Biostimulant Act हा नवा कायदा २०२१ मध्ये केंद्र सरकारने मंजूर केला. याची अंमलबजावणी फेब्रुवारी २०२४ पासून होईल. नुसता कायदा व्हावा म्हणून आम्ही प्रयत्नशील नाही तर त्याच्या अंमलबजावणीविषयीही आम्ही आग्रही आहोत.”
‘शेती’ हा इतर उद्योग-व्यवसायाप्रमाणे फायदेशीर आणि यशस्वी उद्योग बनला पाहिजे, या ध्येयाने झपाटलेले धुरगुडे शेतकऱ्यांना रासायनिक, सेंद्रिय आणि जैविक उत्पादनांचा समतोल आणि योग्य प्रमाणात वापर करण्याचा सल्ला देतात. आपला शेती व्यवसाय नफातोट्याचे गणित पाहूनच करण्याचा सल्ला देतात.


महत्त्वाची उत्पादने ः
-ऑलडाउन (संयुक्त कीटकनाशक)
-गनबुलेट (प्रभावी अळीनाशक)
-निम्बिसिन (नैसर्गिक कीटकनाशक)
- पार्टनर (संयुक्त बुरशीनाशक)
- ग्रिप (पीकवाढ संजीवक)
- मॅक्सफीड (१०० टक्के विद्राव्य खते)
-बायोधन (सेंद्रिय दाणेदार खत)
-डाउनअप (प्रभावी तणनाशक)
--------------------
राजकुमार भानुदासराव धुरगुडे पाटील
(चेअरमन व एम.डी., सन अँड ओशन ग्रुप, पुणे)
-------------------
संपर्क ः ०२०- २४२१३६२३, २४२१७३३३
ई-मेल ः rajdurg@gmail.com

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com