Watermelon Farming: खानदेशात उन्हाळी कलिंगडाची लागवड घट; तापमान आणि कमी दराचा फटका!

Heatwave Impact on Crop: खानदेशात उन्हाळी कलिंगडाची लागवड तुलनेने कमी झाली आहे. तापमानवाढ, कमी दर आणि रोगराईमुळे अनेक शेतकऱ्यांनी फेब्रुवारीनंतर लागवड टाळली आहे, त्यामुळे एप्रिलअखेर बाजारात कलिंगडाची आवक घटण्याची शक्यता आहे.
Watermelon Farming
Watermelon FarmingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News: खानदेशात उन्हाळ कलिंगडाची लागवड अल्प आहे. अधिकची उष्णता, कमी दर आणि रोगराई या समस्या लक्षात घेता उन्हाळ कलिंगड लागवड कमी असून, पीक वाढविण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे.

खानदेशात रमझान महिन्यातील बाजारपेठ हेरण्यासाठी डिसेंबरमध्ये सर्वाधिक कलिंगडाची लागवड झाली होती. यंदा लागवडीत मोठी वाढ झाली. कारण मागील हंगामात कलिंगडाचे दर बऱ्यापैकी होते. एकरी एक ते दीड लाख रुपये नफा अनेकांना मागील वेळेस मिळाला होता. तसेच मार्च ते एप्रिल या कालावधीत कलिंगडाच उठाव होता.

Watermelon Farming
Watermelon Farming: कलिंगड पिकाचे यशस्वी नियोजन: गणेश काळे यांची आधुनिक शेती

दरही टिकून होते. मागील हंगामात किमान नऊ व कमाल १४ रुपये प्रतिकिलोचा दर कलिंगडास फेब्रुवारी, मार्च व एप्रिलमध्ये मिळाला होता. मागील हंगामात खानदेशात फक्त तीन हजार हेक्टरवर कलिंगड पीक होते. यंदा पाऊसमान चांगले होते. यामुळे अन्य फळे व भाजीपाला पिकांएेवजी अनेकांनी कलिंगडाची लागवड केली. काही शेतकऱ्यांनी पपई व केळी पिकात कलिंगडाची आंतरपीक म्हणून लागवड केली.

तर अनेकांनी सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, केळी आदी पिकांखालील क्षेत्र रिकामे झाल्यानंतर त्यात पूर्वमशागत करून कलिंगडाची लागवड केली. यंदा खानदेशात कलिंगडाची लागवड सुमारे १० हजार हेक्टरवर झाली.

नंदुरबारातील शहादा, नंदुरबार, तळोदा, नवापूर, धुळ्यातील शिरपूर, धुळे, साक्री, जळगावातील चोपडा, जामनेर, यावल, रावेर, जळगाव या भागात कलिंगडाची मोठी लागवड डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत झाली. परंतु डिसेंबर व जानेवारीत लागवडीच्या कलिंगडात रावेर भागात रोगराई आली. जामनेरातही काहींचे पीक खराब झाले. तसेच दरही कमी मिळाले. यामुळे पुढे फेब्रुवारीच्या मध्यानंतरची लागवड कमी झाली.

Watermelon Farming
Watermelon Farming: कलिंगडांचा दर्जा राखण्यावर भर

उन्हाळ्यातील बाजार हेरण्यासाठी कलिंगडाची फेब्रुवारीच्या मध्यानंतर लागवड करावी लागते. ही लागवड खानदेशात अत्यल्प किंवा सुमारे ५०० हेक्टर एवढीच आहे. यामुळे एप्रिलअखेरीस खानदेशात कलिंगडाचे उत्पादन, आवक फारशी नसणार अशी स्थिती आहे.

तापमानाचा फटका

उष्णता खानदेशात फेब्रुवारीतच वाढली. यामुळे कलिंगडास मोठा फटका बसला. फेब्रुवारीच्या मध्यात लागवड केलेल्या कलिंगड पिकात फळे, फुले लगडत आहे. या फळांचे उष्णतेपासून संरक्षण करण्याची लगबग शेतकरी करीत आहे. फळांवर केळीची कोरडी पाने, कागद टाकून फळे झाकली जात आहेत. ज्या क्षेत्रात कलिंगडास पाला कमी आहे, त्या भागात समस्या अधिक आहेत. तसेच फवारणी व खतांसह सिंचनासंबंधी काटेकोर नियोजन करावे लागत आहे. सायंकाळी खते देण्यासह फवारणी व सिंचनाचे काम शेतकरी करीत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com