

Palghar News : डहाणू तालुक्यात धामणी आणि कवडास धरणांच्या माध्यमातून पाणीपुरवठा होतो. बंधाऱ्याच्या माध्यमातून उन्हाळ्यात शेतकरीवर्ग उन्हाळी भातशेती लागवड करण्याकडे वळला आहे. लघू पाटबंधाऱ्याच्या पाटाच्या पाण्यावर भाताची लागवड करून डहाणू तालुक्यातील शेतकरी भाताचे उत्पादन घेतात. सध्या डहाणूतील उन्हाळी भातशेती उत्तम स्थितीत असून, पीक पोटरीत येण्याच्या अवस्थेत आहे.
सातत्याने हवामान बदल, वातावरणात बदल, पावसाचे अनिश्चित स्वरूप यामुळे शेतकऱ्यांचा खरीप हंगामात अपेक्षित उत्पादन मिळत नाही. यंदा खरीप हंगामात ऐन कापणीच्या वेळेस पावसाने झोडपून काढल्याने उभे भातपीक आडवे, तर कापलेले भातपीक शेतातच कुजल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे खरिपापेक्षा उन्हाळी भातशेती फायदेशीर असल्याचे या परिसरातील शेतकऱ्यांनी सांगितले.
डहाणू तालुक्यात रब्बी हंगामात शेतकरी साधारणत: जानेवारीच्या मध्यवधीच्या आसपास उन्हाळी भातपेरणी केली जाते. यंदा कालव्याच्या दुरुस्तीमुळे कासा मंडळातील गावे उन्हाळी भातशेतीपासून वंचित राहिली आहेत. डहाणू तालुका आणि वाणगावच्या पूर्वेकडील गावांमध्ये पाटपाण्याच्या आधारावर उन्हाळी भातशेतीची पेरणी केली आहे, असे डहाणू तालुका कृषी विभागामार्फत सांगण्यात आले आहे.
उन्हाळी भातशेती फायदेशीर
पावसाळी हंगामात जुलै आणि ऑगस्टमध्ये सूर्यप्रकाश कमी असतो. उन्हाळी हंगामात भातपिकाच्या वाढीच्या काळात प्रखर सूर्यप्रकाश असतो. त्यामुळे खतास प्रतिसाद जास्त मिळतो. उन्हाळी हंगामातील जास्त तापमान व कमी आर्द्रतेचे प्रमाण यामुळे प्रतिकूल हवामानामुळे काही रोगाचे प्रमाण पावसाळी भातपिकापेक्षा काही प्रमाणात कमी राहते. उन्हाळी हंगामात भातपिकाची उंची पावसाळी पिकापेक्षा कमी असते. उन्हाळी भातात तांदळाचे प्रमाण अधिक असते.
स्थानिक जातीची निवड
उन्हाळी भात लागवडीसाठी स्थानिक जातींबरोबरच राशी पूनम, कर्जत १८४, कर्जत ३, कर्जत ४, रत्नागिरी, रत्ना, सह्याद्री, पालघर- १ आदी साडेतीन ते चार महिन्यांत तयार होणाऱ्या जातींचा वापर करण्यात येतो.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.