Farm Produce : उन्हाच्या झळा शेत मालासह जनावरांच्या बाजारावरही, निम्म्याने आवक घटली

Vegetable Market : पालेभाज्या, फळभाज्यांचे भाव स्थिर दिसत आहेत तर कोबी, फ्लॉवर, टोमॅटोची जास्त आवक आहे.
Farm Produce
Farm Produceagrowon

Kolhapur Market Situation : कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जनावरांचे मोठे बाजार भरले जातात परंतु यंदा उन्हाच्या कडाक्याने बाजारातील आवक निम्म्यावर आल्याचे दिसून येत आहे. दरम्यान अशीच परिस्थिती भाजी मंडईतही दिसत आहे. पालेभाज्या, फळभाज्यांचे भाव स्थिर दिसत आहेत तर कोबी, फ्लॉवर, टोमॅटोची जास्त आवक आहे.

मागच्या महिनाभरात वांग्याचे दर अतिषय कमी झाले होते परंतु या आठवड्यात दरात काहीशी तेजी असल्याचे दिसत आहे. तर मार्केटमध्ये कोकणातून आंब्यांची आवक वाढल्याने दरात किंचीत घसरण झाली. परंतु अद्यापही दर १ हजारच्या आसपास असल्याने सर्वसामान्यांसाठी महिनाभर आंबा आंबट राहण्याची चिन्हे आहेत.

जनावरांच्या बाजारात म्हशींची आवक मंदावल्याने दर आठवड्याच्या तुलनेत निम्म्याने आवक झाल्याचे बाजार समितीतून सांगण्यात येत आहे. गडहिंग्लज तालुक्यात जनावरांचे मोठे बाजार भरतात मागच्या दोन दिवसांत एका बाजारात सुमारे ५० जनावरांची आवक नोंदली होती.

पण, मागणीअभावी व्यवहार जेमतेमच दिसत आहेत तर जनावरांचे दर चाळीस हजार ते लाखापर्यंत स्थिर आहेत. शेळ्या-मेंढ्याची तर केवळ वीसभर आवक दिसली. गाई आणि बैलजोड्यांची आवक झाली नाही.

Farm Produce
Kolhapur Irrigation Federation : 'राज्य सरकार आणि जलसंपदा विभागाची शेतकऱ्यांविरोधात हुकुमशाही आहे का'?

भाजी मंडईत हिरव्या मिरचीचा दर दहा किलोमागे १०० रुपयांनी वधारला आहे. ढब्बू, वरणा, दोडका, बिन्स, कारली यांचे दर स्थिर आहेत. कोथिंबीर दहा रुपये पेंढी होती. पालेभाज्या ७ ते १० रुपये पेंढी आहेत. वांगी २५० ते ३५० रुपये दहा किलो आहेत. गेल्या आठवड्यापेक्षा १०० रुपयांनी दर सावरला आहे.

कांदा, लसूण आणि बटाट्याचे भाव कायम आहेत. फळ बाजारात कोकणातील हापूस दाखल झाला आहे. डझनाचा १२०० ते १५०० रुपये दर असल्याने फळांचा राजा सर्वसामान्यांसाठी अद्याप आंबटच आहे. स्थानिक आंबे दाखल झाल्यावरच महिन्याभरानंतर हे दर कमी होतात. द्राक्षे ५०, डाळिंब, संत्री, पेरू, चिक्कू ८० रुपये किलो आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com