Farmer in India : देशातील भाजपचे सरकार शेतकरीविरोधी : सचिन पायलट

Sachin Pilot : गरीब-श्रीमंत व शहर-ग्रामीण भेदभाव दूर करणे गरजेचे असल्याचे पायलट म्हणाले.
Farmer in India
Farmer in Indiaagrowon

Central Government : सध्याचे देशातील भाजपचे सरकार शेतकरीविरोधी आहे. सर्वच क्षेत्रांचे खासगीकरण सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे व सर्वसामान्य जनतेचे हित जोपासण्यासाठी काँग्रेसच्या विचाराचे सरकार देशात आले पाहिजे, असे प्रतिपादन राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी केले.

पायलट हे कोल्हापूर आणि सांगली जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी लोकसभा मतदार संघाविषयकही माहिती जाणून घेतली.

बुर्ली ते सूर्यगाव कृष्णा नदीवरील जोड रस्त्याच्या पुलाच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. पायलट म्हणाले, सध्या देशातील वातावरण गढूळ झाले आहे. विरोधकांना नेस्तनाबूत करण्याची भाषा केली जात आहे, हे देशाच्या दृष्टीने घातक आहे. गरीब-श्रीमंत व शहर-ग्रामीण भेदभाव दूर करणे गरजेचे असल्याचे पायलट म्हणाले.

तसेच सध्या देशात शेतकरीविरोधी सरकार आहे. आपला देश शेतीप्रधान आहे. शेतकरी मजबूत तरच देश मजबूत, यासाठी देशात पुन्हा शेतकरी हितासाठी शेतकऱ्यांच्या विचाराचे सरकार देशात येणे आवश्यक असल्याचे सचिन पायलट म्हणाले.

Farmer in India
PM Kisan Farmers : PM किसानचा 16वा हप्ता जमा झाला नाही? शेतकऱ्यांनी कुठे तक्रार करावी?

विश्वजित कदम म्हणाले, महापुरात नागरिकांचे हाल होत असल्याने बुर्ली ते सूर्यगावदरम्यान कृष्णा नदीवर पुलाची मागणी येथील नागरिक करीत होते. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करुन पुलास मान्यता मिळवली. जवळपास २९ कोटींच्या खर्चाचा हा पूल आहे. निधी आणण्याची धमक फक्त आमच्याकडेच आहे. केवळ श्रेय घेण्याचे काम विरोधक करतात.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री आमदार डॉ. विश्वजित कदम होते. यावेळी माजी आमदार मोहनराव कदम, आमदार विक्रम सावंत, प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष विशाल पाटील, जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड, पृथ्वीराज पाटील, जितेश कदम, गणपतराव सावंत, उत्तम पवार, शिकंदर जमादार, सर्जेराव पवार, बाळासाहेब पवार, बुर्लीच्या सरपंच दीपाली काळे आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com