Agriculture Irrigation : मराठवाड्यातील प्रकल्पांतून उन्हाळी आवर्तनांची तयारी; शेतकऱ्यांना दिलासा

Jayakwadi Dam Water Storage : मराठवाड्यातील विविध प्रकल्पामधून उन्हाळी हंगामासाठीची पाण्याची आवर्तने दिली जाणार आहेत. अर्थात काही तांत्रिक अडचणी आल्या तरच आवर्तनात बदल करण्यात येईल.
Agriculture Irrigation
Jaykwadi DamAgrowon
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील विविध प्रकल्पामधून उन्हाळी हंगामासाठीची पाण्याची आवर्तने दिली जाणार आहेत. अर्थात काही तांत्रिक अडचणी आल्या तरच आवर्तनात बदल करण्यात येईल. जायकवाडी धरणातून डाव्या आणि उजव्या कालव्यातून चार आवर्तनांचे उन्हाळी हंगामासाठी नियोजन करण्यात आलेले आहे.

तथापि तीन आवर्तने दिली जातील आणि गरजेनुसार चौथे आवर्तन दिले जाणार आहे. आवर्तने सोडताना शेतकऱ्यांची अडचण होणार नाही यांची खबरदारी घेण्याचे निर्देश जलसंपदामंत्री विखे पाटील यांनी दिले.

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी जायकवाडी प्रकल्प, नांदूर मधमेश्वर कालवा प्रकल्प, निम्न दुधना प्रकल्प, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प, पूर्णा प्रकल्प (येलदरी व सिद्धेश्वर प्रकल्प), विष्णुपुरी व निम्न मानार या सात मोठ्या प्रकल्पावरील सिंचन पाणी नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली.

जलसंपदामंत्री विखे पाटील यांनी प्रकल्पाच्या पाण्याचे नियोजन प्रभावीपणे राबविण्याबाबत निर्देश दिले आहेत. प्रकल्पाच्या कालव्याची वहनक्षमता पुनर्स्थापित करण्याच्या दृष्टीने दुरुस्ती बाबतही यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. शेवटच्या लाभधारकांना पाणी मिळण्यासाठी प्रभावी सिंचन राबविण्यात यावे, प्रकल्पाचे जल लेखा परीक्षण वेळोवेळी करण्यात यावे असेही स्पष्ट केले.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : शेतकऱ्यांना दिलासा: गिरणा धरणाचे पाणी शेवटच्या टप्प्यापर्यंत

नांदूर मध्यमेश्वर कालवा प्रकल्प

नांदूर मध्यमेश्वर कालवा प्रकल्पासाठी बांधण्यात आलेल्या नाशिक जिल्ह्यात मुकणे, भाम, भावली व वाकी या ४ धरणामध्ये ३०३. ३८ दलघमी (१००%) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला. नांदूर मधमेश्वर कालवा मुखाशी सिंचनासाठी उपलब्ध पाणीसाठ्यावर रब्बी हंगामात २ पाणी आवर्तन देण्यात आली. त्यासाठी ८०.४७ दलघमी पाणी वापर झाला.

उन्हाळी हंगामात बिगर सिंचन वापरासाठी (पिण्यासाठी) एक आवर्तन देण्यात येणार. उन्हाळी हंगामात सिंचनासाठी एक आवर्तन देण्याची मागणी आहे. त्याची दोन्ही विभागांनी तपासणी करावी. शिवना टाकळी प्रकल्पातून पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मागणीनुसार निर्णय घेण्यात येईल.

निम्न दुधना प्रकल्प

धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा असून धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना ३१ जुलै २०२५ अखेरपर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन करण्यात आले. उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी हंगामात ३ पाणी आवर्तन देण्यात आली. त्यासाठी २४.३० दलघमी पाणी वापर झाला. उन्हाळी हंगामात ३ पाणी आवर्तन देण्यात येणार आहे. पाण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मागणी नुसार पिण्यासाठी पाणी देण्यात येईल.

ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प

या वर्षी धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना ३१ जुलै २०२५ अखेरपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी हंगामात ३ पाणी आवर्तन देण्यात आली. त्यासाठी १७६.२३ दलघमी पाणी वापर झालेला आहे. उन्हाळी हंगामात ४ पाणी आवर्तन देण्यात येणार आहेत.

नदीकाठच्या गावासाठी पिण्याच्या आरक्षणात वाढ करण्यात यावी (एकूण ५० दलघमी) निर्मित झालेले परंतु अहस्तांतरीत असलेले सिंचन क्षेत्रातील चा-यांची व पोट चा-यांची कामे पूर्ण करून व्यवस्थापनासाठी त्वरित (सुमारे २०००० हे) हस्तांतरित करावे. कालव्याच्या नूतनीकरणास प्राधान्य देण्यात येईल.

Agriculture Irrigation
Agriculture Irrigation : सिंचन क्षमता सुधारणेतून उत्पादनवाढ व्हावी

पूर्णा प्रकल्प (येलदरी व सिद्धेश्वर धरण)

या वर्षी दोन्ही धरणामध्ये उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना ३१ जुलै २०२५ अखेरपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी हंगामात ४ पाणी आवर्तन देण्यात आली असून त्यासाठी १४६.६० दलघमी पाणी वापर झाला आहे.उन्हाळी हंगामात ४ पाणी आवर्तन देण्यात येणार आहे. सिद्धेश्वर उपसा सिंचन योजना / केळी पाझर तलावात पाणी सोडण्याबाबत बैठक घेण्यात येईल. प्रकल्पाच्या कालव्याची दुरुस्ती करण्याची व जलसंपदा विभागाच्या जागा सरंक्षित करण्याचे निर्देश देण्यात आले.

विष्णुपुरी प्रकल्प

या वर्षी धरणामध्ये ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला. धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना ३१ जुलै २०२५ अखेर पर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी हंगामात २ पाणी आवर्तन देण्यात आले. नांदेड शहरासाठी व टंचाई कालावधीसाठी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असल्यामुळे उन्हाळी हंगामाचे नियोजन करण्यात आलेले नाही.

निम्न मानार प्रकल्प

या वर्षी धरणामध्ये ७५ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला. धरणावर अवलंबून असलेल्या सर्व पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना ३१ जुलै २०२५ अखेरपर्यंत पाणी पुरेल असे नियोजन करण्यात आले आहे. उर्वरित उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी हंगामात ०३ पाणी आवर्तन देण्यात आलेली असून त्यासाठी ४५.२१ दलघमी पाणी वापर झालेला आहे. उन्हाळी हंगामात ४ पाणी आवर्तन देण्यात येणार आहेत.

जायकवाडीतून मिळणार आवर्तन

या वर्षी पिण्याचे व औद्योगिक मंजूर पाणी पुरवठा योजनांना ३१ जुलै २०२५ अखेर पर्यंत पाणी पुरेल, असे नियोजन करण्यात आले आहे. उपयुक्त पाणीसाठ्यावर रब्बी हंगामात ३ पाणी आवर्तन देण्यात आली आहेत. त्यासाठी ४८५ दलघमी पाणी वापर झालेला आहे. उन्हाळी हंगामात ३ पाणी आवर्तन आवश्यक असल्यास चौथे आवर्तन देणे प्रस्तावित आहे. जालना जिल्ह्यातील अतिरिक्त सिंचनासाठी पश्चिम वाहिन्यांचे पाणी आल्यानंतर विचार करण्यात येणार.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com