Summer Crop : पाच हजार ९४० हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिके बहरली

किनवट तालुक्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरीप व रब्बी हंगामात पिके घेतली जातात.
Summer Crop
Summer CropAgrowon
Published on
Updated on

Nanded News : किनवट तालुक्यामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात खरीप (Kharif) व रब्बी हंगामात (Rabi Season) पिके घेतली जातात. यावर्षी खरीप आणि रब्बीमध्ये पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी उन्हाळी पिकांना पसंती दिली आहे.

तालुक्यातील उन्हाळी हंगामासाठी यंदाचे सर्वसाधारण क्षेत्र पाच हजार १७४ हेक्टर आहे. तालुका कृषी कार्यालयाच्या अहवालानुसार यंदा शंभर टक्क्यापेक्षा जास्त म्हणजे पाच हजार ९४० हेक्टरवर विविध उन्हाळी पिकांची पेरणी करण्यात आली आहे. त्याची टक्केवारी ११४.८० भरते. त्यासोबतच ज्वारी व मका चारा पिकांचीही १६० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

Summer Crop
Rabi Crop Harvesting : वादळी पावसामुळे रब्बी पिकांच्या काढणीला वेग

दरवर्षीपेक्षा यावर्षी उन्हाळ्यामध्ये भुईमुगाच्या पेऱ्यात घट झाली आहे. सोयाबीन, तीळ व मुगाचा पेरा वाढल्याचे कृषी विभागाच्या पीक पेरणी अहवालातून दिसून येत आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

तालुक्यातील शेतकरी गतवर्षापासून उन्हाळी पिकांमध्ये तृणधान्यात ज्वारी, मका तर गळीत धान्यात भुईमूग व तीळ पीक घेण्यात जास्त रस दाखवीत आहेत. तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे वा प्रकल्पातील पाणी मिळू शकते, अशा भागात उन्हाळी पिके घेण्यात आली आहेत.

तृणधान्यातील उन्हाळी ज्वारीसाठी एक हजार ६७६ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र असून, एक हजार ७८९ हेक्टर ज्वारीचा पेरा झाला आहे. ज्याची टक्केवारी १०६.७४ आहे.

मक्यासाठीचे क्षेत्र ९२७ हेक्टर असून, यंदा एक हजार २०८ हेक्टरवर अर्थात १३०.३१ टक्के पेरणी झाली आहे. उन्हाळी भातासाठी ९३ हेक्टर क्षेत्र असून यंदा भाताची पेरणी अजून तरी झाली नाही.

गळीतधान्यात भुईमूगासाठी सर्वसाधारण क्षेत्र एक हजार ४७१ हेक्टर असून, या वर्षी पेरा कमी होऊन एक हजार ३३ हेक्टरवर अर्थात ७०.२२ टक्केच पेरा झाला आहे. तिळासाठीचे क्षेत्र ७८४ हेक्टर होते त्यात वाढ होऊन तब्बल एक हजार १८५ हेक्टरवर तीळ पेरण्यात आला आहे.

त्याची टक्केवारी १२०.४३ टक्के आहे. या शिवाय उन्हाळी मूग ३४ हेक्टर, चारा पिकात ज्वारी ६३ हेक्टर, मका ९७ हेक्टर, खरीप बियाण्यासाठी सोयाबीन ४४ हेक्टर तर भाजीपाल्याची ३२८ हेक्टरवर लागवड झाली आहे.

Summer Crop
Rabi Crop : पाण्याअभावी रब्बी पीक धोक्यात

सोबतच केळी ४५ हेक्टर, ऊस ३८ हेक्टर, टरबूज ३५ हेक्टर, धने १२ हेक्टर, कांदा सहा हेक्टर तर मिरची २३ हेक्टरवर घेण्यात आली आहे.

दरम्यान, गतवर्षी उन्हाळी हंगामासाठी चार हजार ६५९ हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र होते. यंदा त्यात ५१५ हेक्टर क्षेत्र वाढून सुद्धा यंदाची उन्हाळी पेरणी आतापर्यंत ११४.८० टक्के झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com