Nashik News : तालुक्यातील अर्जुनसागर धरणाच्या सुळे उजवा कालव्यास गळती लागल्याने हजारो लिटर पाणी रवळजी येथील धाकलदर शिवारातील शेतकरी किसन काशीराम जाधव यांच्या मका पिकात गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुळे उजव्या कालव्याचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
सुमारे २१ किलोमीटर अंतर असलेल्या सुळे उजवा कालव्याचे गेल्या वीस वर्षांपासून संथगतीने काम चालू असून, सार्वजनिक पाटबंधारे विभागाने चुकीचा आराखडा तयार केल्यानेच ठिकठिकाणी गळती लागली आहे.
दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे अर्जुनसागर धरण ओव्हर फ्लो झाले आहे. त्यामुळे सुळे उजव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले आहे. मात्र, कालव्यात कचरा असून पावसाळ्यात पाटबंधारेच्या वतीने कचरा काढण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
कालव्याला पाणी सोडण्यास विरोध नाही. परंतु, कालव्याची दुरुस्ती आधी आणि नंतर पाणी सोडण्याची आवश्यकता होती, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे किसन भालेराव, अनिल जाधव, गोकुळ जाधव, दीपक निकम यांच्या शेतात कालव्याचे हजारो लिटर पाणी गेल्याने पिकांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी बबन जाधव, अनिल जाधव यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.